सध्या सोशल मीडियावर एका शेळीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की ही शेळी मंदिरामधील देवासमोर नतमस्तक झाली आहे. शेळीला अशाप्रकारे नतमस्तक होताना पाहून मंदिरातील इतर भाविकही थक्क झाले आहेत. भक्तीमध्ये लीन झालेल्या या शेळीचा व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होणार हा व्हिडीओ उत्तरप्रदेशातील कानपुरच्या आनंदेश्वर मंदिरातील आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की मंदिरात आरती सुरु असून सर्व भक्त देवासमोर हात जोडून उभे आहेत. याचदरम्यान ही शेळीही भक्तीमध्ये तल्लीन झालेली दिसते. मंदिरातील एका भक्ताने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

डेविड जॉन्सन या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘कानपूरमधील परमत मंदिरातून श्रद्धेचे अप्रतिम चित्र समोर आले आहे. येथे एक शेळी भगवान आनंदेश्वरांच्या आरतीमध्ये श्रद्धेने गुडघे टेकलेली दिसते.’ या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्स या घटनेला चमत्कारी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A goat bowed down in lord shankara temple watch this viral video that shows a unique form of devotion pvp
Show comments