Viral Video : आजी आणि नातीचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, मैत्री जिव्हाळा, अन् आपुलकी दिसून येते. आजीचा जीव नेहमी नातवंडांमध्ये असते. ती नातवंडांवर खूप प्रेम करते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील आजी नातीचं प्रेम पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पंगत दिसेल. या पंगतीमध्ये आजी बसलेल्या दिसत आहेत. एका आजीच्या शेजारी तिची नात सुद्धा जेवायला बसली आहे. दोघी आजी नाती एकाच ताटामध्ये जेवण करत आहे. आजी नातीला घास भरवताना दिसत आहे. ती आधी नातीला घास भरवते आणि नंतर स्वत: जेवण करते. आजीचे प्रेम हे जगावेगळे असते, हे तुम्हाला या व्हिडीओतून दिसून येईल. आजीचे हे प्रेम आणि माया पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून आजीची आठवण येईल तर काही लोकांना लहानपणीचे दिवस आठवतील. आजीबरोबर घालवलेले सुंदर क्षण आठवतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
shailesh_sathe_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आज्जीची माया ही वेगळीच असते” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ही पिढी शेवटची असेल…. कारण याच्यापुढे अशी आजी कुणाच्याच नशिबी नसणार..” तर एका युजरने लिहिलेय, “हे बघून गावातल्या लग्नात बसलेल्या पंगती ची आठवण आली” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच ! निशब्द…हा विडीओ पाहून आजीची आठवण आली …आणि थोड रडू पण आलं. सलाम त्या व्हिडीओ बनवणाऱ्याला” एक युजर लिहितो, “आज्जी म्हणजे उनातली साऊली आज्जी म्हणजे मायेची माऊली” तर एक युजर लिहितो, “ही पिढी शेवटची असेल…. कारण याच्यापुढे अशी आजी कुणाच्याच नशिबी नसणार… कारण आपली आजी वृध्दाश्रममध्ये असणार … आपल्या मुलांना तर आजीची कमी वाटू देवू नका आणि आई बापाला वृध्दाश्रम मध्ये न ठेवता आपल्या सोबत ठेवा म्हणजे आपल्या मुलांच्या नशिबी आजीच प्रेम येऊ द्या” अनेक युजर्स व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.