मुलांना घडविण्यात आई-वडील आणि आजी-आजोबांचा सिंहांचा वाटा असतो. आपल्या मुलांना किंवा नातवंडाना चांगलं आयुष्य मिळावं म्हणून ते आयुष्यभर झटत असतात, कष्ट करत असतात.
जेव्हा ही मुले आयुष्यात यशस्वी होतात, आपल्या पायावर उभी राहतात तेव्हा या मुलांचं कर्तव्य असतं की त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना त्या सर्व सुखसोयी आणि आनंद द्यावा पण सध्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात हे खूप कमी पाहायला मिळतं; मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक नातू आपल्या आजीला पॅरिसला फिरायला घेऊन आलाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : हेही वाचा – पुणेकरांनो रस्त्याच्या कडेला गाडी थांबवताय? हा भयानक अपघाताचा CCTV Video पाहून व्हाल थक्क

middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
Young man draws beautiful picture of conductor on ticket video goes viral
“कधीतरी दुसऱ्याच्या आनंदाचे कारण बना”, तरुणाने तिकिटावर रेखाटले कंडक्टरचे सुंदर चित्र, Viral Video पाहून चेहऱ्यावर येईल हसू

ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानच्या डॉ. उसामा अहमद (Dr Usama Ahmed) या एका डेंटिस्ट तरुणाने आपल्या आजीला पॅरिस दाखवायला आणले. या व्हिडीओत उसामा आपल्या आजीसोबत पॅरिसमध्ये फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उसामाने लिहिलंय, ‘आजीला तिच्या आयुष्यातील सुंदर क्षण देताना…’
उसामा आजीला घेऊन फ्रान्सला आला आणि त्याने पॅरिस शहर दाखवले. आजीसाठी हा खूप सुंदर आणि नवा अनुभव होता. व्हिडीओत आजी खूप आनंदी दिसतेय आणि हे सुंदर क्षण जगताना दिसत आहे.

हेही वाचा : 2000 Rupee Note: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा 2000 रु. ची नोट घेण्यास नकार; ग्राहकाच्या गाडीत भरलेले पेट्रोल घेतले काढून

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजी खिडकीतून पॅरिसचे रस्ते बघतेय. त्यानंतर उसामा आजीला बाहेर फिरायला घेऊन जातोय आणि आजीला उंच
टाचेची सॅण्डल खरेदी करून देतो. आजी-नातू पॅरिस भ्रमंतीचा आनंद लुटताना दिसतात. एवढंच काय तर एका फोटोमध्ये उसामा आपल्या आजीसोबत अभिनेता शाहरुख खानच्या सिग्नेचर स्टेपमध्ये हात लांब करून पोज देताना दिसतोय.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी हा व्हिडीओ अनेकांना शेअरसुद्धा करत आहे. व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी उसामाचे कौतुक करत कमेंट्सचा पाऊस पाडलाय

Story img Loader