Viral Video : आजी आणि नातवंडाचे नाते हे जगावेगळे असतात. नातवंडाना लहानाचे मोठे होताना आजी पाहत असते. नातवंडाच्या मुलांना म्हणजेच परतुंडांनासुद्धा आजी तितकाच जीव लावते आणि त्यांच्यावर प्रेम करते. अनेक मुलांना पणजी पाहता येत नाही पण काही नशीबवान मुले असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात पणजींचा सहवास लाभतो.पणजी म्हणजे आईबाबांचे आजी आजोबा. सध्या असाच एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी तिच्या परतुंड बरोबर व्हिडीओ कॉलवर बोलताना दिसत आहे. परतुंड आणि पणजीचे प्रेम पाहून तुम्हालाही तुमच्या पणजीची आठवण येऊ शकते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आजी बाहेर फिरायला आली आहे. नऊवारी नेसलेली आजी अतिशय साधी भोळी दिसत आहे. तिला पाहून अनेकांना त्यांच्या पणजी किंवा आजीची आठवण येईल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की आजी परतुंडबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत आहे. आजी परतुंडला तुझ्यासाठी खाऊ आणते, असं प्रेमाने सांगताना व्हिडीओत दिसत आहे. आजीचा परतुंडाबरोबरचा गोड संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आजीबरोबर काही तरुण मुलेही दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच

हेही वाचा : “हाडं आहेत की नाही भावा…” चिमुकल्याने केला हातावर ब्रेक डान्स, टॅलेंट पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

sundarabai1948 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी फिरायला आल्यानंतर परतुंड सोबत व्हिडीओ कॉल वर बोलताना” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझी आई पण अशीच खुश झाली होती आईची आठवण आली” तर एका युजरने लिहिलेय, “हेच खरं प्रेम आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हीच पिढी आहे भावांनो जिला प्रेम, सुख दु:ख सगळं समजतंय.. आजीला साष्टांग नमस्कार..” एक युजर लिहितोय, “आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून डोळे भरुन आले.”

या आजीचे नाव सुंदराबाई असून तिच्या नातवंडांनी तिच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट उघडले आहेत. या अकाउंटवरुन तिचे अनेक मजेशीर आणि भावनिक व्हिडीओ शेअर केले जातात. युजर्स सुद्धा आजीच्या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसून येतात.

Story img Loader