Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण असतो. लग्नानंतर व्यक्तीचे आयुष्य बदलते. प्रत्येक जण धुमधडाक्यात लग्न सोहळा साजरा करतात. लग्न सोहळ्यात गाणी, डान्स आणि विविध मजेशीर परंपरा दिसून येतात. सोशल मीडियावर लग्नातील विविध परंपरेचे आणि इतर कार्यक्रमांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरेदव हळदीच्या दिवशी डिजेवर नाही तर हरिपाठावर डान्स करत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

कोणताही लग्न समारंभ डान्सशिवाय शक्य नाही. नवरदेव आणि नवरीसह अख्ख कुटुंब डान्स करत आनंद साजरा करताना दिसतात. डान्स म्हटले की डिजे आलाच. डिजेच्या आवाजात डान्स करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल पण या व्हायरल व्हिडीओमध्ये या नवरदेवाने संस्कृती जपत डिजेच्या तालावर नाही तर हरिनामाच्या गजरावर डान्स केला आहे. नवरदेव हळदीच्या दिवशी हरिनामाच्या गजरात थिरकताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

हेही वाचा : आंब्यांचे गणित! विक्रेत्याची स्टाईल पाहून व्हाल अवाक्; PHOTO पाहून वही-पेन घ्याल हातात

हा व्हायरल व्हिडीओ लग्नातील हळदीच्या कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की नवरदेव हरिपाठ गात डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला वारकरी वेशभूषेत इतरही लोक दिसतील. ज्यांच्या डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात टाळ आहे. व्हिडीओत या वारकऱ्यांसह नवरदेव नाचताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत घरातील इतर सदस्य आणि महिला सुद्धा हरिपाठावर ठेका धरताना दिसतात.

पाहा व्हिडीओ

tushargharpende_17 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डिजेवर तर कुणीही नाचते हरिपाठावर नाचणारा नवरदेव बघितला काय ?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप छान दादा..एकाच नंबर” तर एका युजरने लिहिलेय, “राम कृष्ण हरी.. माऊली खरो खरच अतिशय सुंदर अशा प्रकारे तुम्ही वारकरी संप्रदायाची संस्कृती जपली आहे. खरचं या गोष्टी बघून खूप छान वाटतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “आपली संस्कृती जपणारी माणसं”

Story img Loader