Viral Video : सोशल मीडियावर उखाण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका नवरदेवाने भन्नाट उखाणा घेतला आहे. या नवरदेवाचा उखाणा ऐकून तुमच्याही चेहऱ्यावर तेज येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. लग्न असो किंवा कोणत्याही शुभ प्रसंगी आवडीने उखाणा घेतला जातो. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेतले जाते, यालाच उखाणा म्हणतात. पूर्वी फक्त महिलाच उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळीसुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसतात. उखाणा घेणाऱ्या या नवरदेवाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरदेवाने घेतला उखाणा

हा व्हायरल व्हिडीओ नुकतेच लग्नसमारंभ पार पडलेल्या एका घरातील आहे. नवीन जोडपे प्रवेशद्वाराजवळ उभे आहे आणि नवरदेव चक्क उखाणा घेताना दिसत आहे. नवरदेव उखाणा घेताना म्हणतो, “गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणता म्हणता आज लग्नाचा दिवस आला, आधी होतो मोकाट आता फक्त नियम पाळा… या वाघाची कधी शेळी होईल असे वाटले नव्हते मला आजपासून अक्षिता काळे समोर झुकना पडेगा साला”
नवरदेवाचा हा उखाणा ऐकून नवरीसह आजुबाजूला उभे असलेले सर्व नातेवाईक जोरजोराने हसताना दिसतात. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल. अनेकांना हा उखाणा आवडू शकतो.

हेही वाचा : रिक्षाचालक अन् परदेशी पर्यटक, भरदिवसा पर्यटकाला मार्गदर्शन करतानाचा ‘तो’ VIDEO होतोयं व्हायरल; एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ

adityadkale या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता मला कळले ते शुभ मंगल सावधान” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उखाणा खरा ठरला की आई बाबा आठवतील. ऑल द बेस्ट” तर एका युजरने लिहिलेय, “एकदम भारी उखाणा घेतला आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावा सर्वांची हीच परिस्थिती आहे” काही युजर्सनी या नव्या जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर काही युजर्सनी उखाण्याचा व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A groom said amazing and funny ukhana for bride in wedding video goes viral on social media ndj