Ukhana Viral Video : आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये उखाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणताही कार्यक्रम, शुभारंभ किंवा मंगलकार्य उखाणे घेतल्याशिवाय अपूर्ण असतो. हळदकुंकूचा कार्यक्रम असो किंवा सत्यनारायणाची पूजा, लग्नसमारंभ त गृहप्रवेश उखाणे हे हवेच. कोणताही कार्यक्रम असो उखाणे हे आवडीने घेतले जातात.
उखाण्याद्वारे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराने नाव घेतेल जाते आणि अनेकदा जोडीदाराप्रती प्रेम व्यक्त केले जाते.
सध्या लग्नसमारंभ सुरू झाले आहे. सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेक उखाण्यांचे व्हिडीओ सुद्धा चर्चेत येत आहे. महिलांप्रमाणे पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेताना दिसत आहे. सध्या असाच एका नवविवाहित तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पत्नीसह गृहप्रवेश करताना उखाणा घेताना दिसतो. या तरुणाचा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a groom said amazing funny ukhana in front of family and bride video goes viral on social media)
नवरदेवाने सांगितला भन्नाट उखाणा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला नवरदेव आणि नवरी गृहप्रवेश करताना दिसत आहे. नवरदेवाला उखाणा विचारला जातो तेव्हा नवरदेव उखाणा म्हणतो,
“आईला चिंता होती कधी याचं लग्न ठरायचं?
आईला चिंता होती कधी याचं लग्न ठरायचं?
आई आता काळजी करू नको, आता करिश्मा आली आहे
आता तूच बोलशील आई आई नाही.. बायको बायको करायचं…”
नवरदेवाचा उखाणा ऐकून सर्व कुटुंब आणि इतर नातेवाईक जोरजोराने हसताना दिसतात.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
https://www.instagram.com/reel/DCLTkEQoA8I/?igsh=bWcyZjhrbG1iYmlp
marathi_ukhane_insta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवीन नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एका नवरीचा उखाणा चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये उखाणा घेताना म्हणाली, “, “तांदळाला इंग्रजीमध्ये म्हणतात राइस, रविराव माझी पहिली चॉइस” त्यावेळी तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.