Viral Video : उखाणा हा आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे म्हणजे उखाणा घेणे होय. पूर्वी फक्त महिला उखाणा घ्यायच्या पण आता पुरुष मंडळी सुद्धा आवडीने उखाणा घेतात. कोणत्याही शुभ प्रसंगी, मंगलकार्यात आणि लग्नसमारंभात आवडीने उखाणा घेतला जातो. लग्नसमारंभात नवरी आणि नवरदेवाला तर आवर्जून उखाणा घेण्यासाठी विचारले जाते. सोशल मीडियावर नवरदेव नवरीचे उखाणा घेतानाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा काही उखाण्याचे व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव एक भन्नाट उखाणा घेतो. उखाणा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (Video : a Groom’s Epic ‘Ukhana’ for Bride in wedding)
नवरदेवाने घेतला भन्नाट उखाणा
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला स्टेजवर नवरदेव व नवरी बसलेले दिसेल. नवरदेव नवरीच्या अवतीभोवती तरुण मंडळी उभी आहेत आणि नवरदेवाला उखाणा घेण्यास आग्रह धरत आहे. खूप आग्रहानंतर नवरदेव उखाणा घेतो.
उखाणा घेताना नवरदेव म्हणतो,
“भाजीत भाजी मेथीची भाजी आहे स्वस्त
एवढ्या मुलींमध्ये फक्त सोनलच वाटली मस्त” नवरदेवाचा हा उखाणा सर्वजण थक्क झाले.
पुरुषांमध्ये एक उखाणा अतिशय लोकप्रिय आहे. “भाजीत भाजी मेथीची, …. माझ्या प्रीतीची” वरील व्हिडीओमध्ये या तरुणमंडळी सुरुवातीला नवरदेव हाच उखाणा घेईल असे वाटते, पण नवरदेवाने अनोखा उखाणा घेत सर्वांना चकीत केले.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
abhijeet_sonal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नवरदेवाचा नवीन उखाणा”
यापूर्वी सोशल मीडियावर अनेक उखाण्याचे व्हिडिओ चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका नवरदेवाने असाच एक भन्नाट उखाणा घेतला होता. उखाणा असा होता – “आईला चिंता होती कधी याचं लग्न ठरायचं?
आईला चिंता होती कधी याचं लग्न ठरायचं?
आई आता काळजी करू नको, आता करिश्मा आली आहे
आता तूच बोलशील आई आई नाही.. बायको बायको करायचं…” हा उखाणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडला होता.