Viral Video : सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी नवरदेव नवरीच्या उखाण्याचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी लग्नातील विचित्र प्रथेचे व्हिडीओ चर्चेत येतात. नवरदेव आणि नवरीचे तर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव भर मांडवात फोनवर बोलत आहे. लग्नाच्या दिवशी स्टेजवर नवरीबरोबर असताना नवरदेव फोनवर बोलत असल्याने एकच चर्चा रंगली आहे. कॉल किती महत्त्वाचा असेल, असे लोक म्हणताहेत. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Shocking video Young Man Risks His Life By Climbing 30-Ft Hoarding On Highway For Instagram Reel In UP's Saharanpur
“हे सगळं करताना एकदाही आई-वडील आठवत नाहीत?” तरुणानं रीलसाठी अक्षरश: कळस गाठला; VIDEO पाहून थरकाप उडेल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
A Heart-Touching Reunion of two friends
Video : “ही दोस्ती तुटायची नाय” भांडण मिटल्यावर दोघी मैत्रीणी ढसा ढसा रडल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “म्हणून मैत्रीत गैरसमज नसावे”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नातील स्टेजवर नवरदेव नवरी भटजीबरोबर उभे असतात. नवरदेवाच्या समोर भटजी आणि नवरी उभी असताना नवरदेव मात्र फोनवर बिझी दिसतोय. भर मांडवात तो फोनवर बोलत असल्याने नेमका कोणाचा कॉल असेल आणि कॉल किती महत्त्वाचा असेल, याची एकच चर्चा रंगली आहे. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”

anitarao1219_vasaikar_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विचार करा तो कॉल किती महत्त्वाचा असेल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बॉस म्हणत असेल लवकर लग्न करून कामावर ये” तर एका युजरने लिहिलेय, “मॅनेजरचा कॉल आला असेल उद्या कामाला ये पटकन” आणखी एका युजरने लिहिलेय, “नातेवाईकाला रस्ता सांगत असेल.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader