सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.अनेक प्राणी संग्रहालयात पर्यटक प्राण्यांचे व्हिडीओ शेअर करत असतात.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहाच्या कळपाने चालत्या गाडीवर हल्ला केलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चार पाच सिंह रस्त्याच्या मध्यभागी बसलेले दिसत आहे. अचानक पर्यटकांची गाडी येते तेव्हा या गाडीवर दोन सिंह धावून जातात. या गाडीला जाळी लावलेली असते त्यामुळे पर्यटकांना कोणतीही इजा होत नाही पण पर्यटकांना चांगलाच घाम फुटतो. जाळीजवळ उभे असलेले पर्यटक भीतीपोटी मागे जातात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.maxamedsaleebaanyuusuf’s या

अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “सिंहाना हॅलो म्हणायचे होते” तर एका युजरने लिहिलेय, “विचार करा..गाडी काही तांत्रिक कारणामुळे बंद पडली असती तर..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A group of lions attack on moving vehicle shocking video goes viral ndj