Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. लग्नानंतर माणसाचे आयुष्य बदलते. दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची एकत्र सुरूवात करतात. त्यामुळे लग्न सोहळा हा खूप उत्साहाने आणि वेगवेगळ्या प्रथा परंपरा पार पाडून साजरा केला जातो. लग्न सोहळ्यातील अतिशय महत्त्वाची प्रथा म्हणजे मंगलाष्टक. ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रीयन हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह सोहळ्यात वधू वरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून या मंगलाष्टकाद्वारे आशीर्वाद दिला जातो.
मंगलाष्टक ही आठ ओळींची चरण असते आणि एक चरण संपल्यानंतर जमलेली पाहुणे मंडळी वधु वरांवर फुले आणि अक्षंताचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी आणि संस्कृतमध्ये असते. तुम्ही कधी मंगलाष्टक इंग्रजीमध्ये ऐकले आहे का? सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये गुरूजी चक्क इंग्रजीमध्ये मंगलाष्टक म्हणताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही.
हेही वाचा : YouTuber संजू टेकीने कारमध्ये बनवला स्विमिंग पूल अन् भररस्त्यात झाल असं काही, Viral Video बघाच
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लग्न सोहळा दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी एकमेकांच्या समोर उभी आहेत आणि सर्व पाहूणे मंडळी अक्षता घेऊन उभी आहेत. गुरूजी मंगलाष्टक म्हणताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गुरूजी हे इंग्रजीमध्ये मंगलाष्टक म्हणत आहे.
गुरुजी म्हणतात, “Always be alert and compromise. please believe to each other and happily live together. by this place of rising sun and person have lot of satisfaction as such कुर्यात सदा मंगलम् शुमंगलम् सावधान”
त्यांचे मंगलाष्टक ऐकून पाहूण्यांना सुद्धा हसू आवरत नाही. सध्या हा मजेशीर व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
bedhadakbelgav या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लग्नात एवढंच बघायचं राहिलं होतं.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भटजी २० वर्षे लंडनमध्ये होते वाटतं, त्यामुळे जरा गोंधळ उडाला” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या लग्नासाठी या भटजीला बोलावतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “शुभ मंगल सावधान नाही गुरूजी गुड अलर्ट म्हणा” काही लोकांना हा व्हिडीओ आवडला नाही. मंगलाष्टके इंग्रजीत म्हणाल्यामुळे या लोकांनी गुरूजींवर टिका केली आहे.