Viral Video : नुकतीच होळी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. होळी म्हणजे रंगाचा सण होय. या सणाला लोक एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा देतात आणि होळी साजरी करतात. या होळीला तुम्हीही रंग खेळले असाल. पण काही लोकांच्या चेहऱ्यावरील आणि हातापायावरील रंग अजूनही निघाले नसतील. त्या लोकांसाठी एका तरुणाने अनोखा जुगाड शोधला आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. सध्या एका तरुणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जुगाड वापरून तो हाताचा रंग एका मिनिटात स्वच्छ करतो. जर तुम्हालाही त्वचेवरील होळीचा रंग स्वच्छ करायचा असेल तर हा व्हिडीओ पाहा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण होळीचा रंग कसा काढायचा, याची ट्रिक सांगताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या तरुणाच्या हाताला रंग लागलेला आहे. त्या रंगाला स्वच्छ करण्यासाठी तो हातावर थोडा शॅम्पू टाकतो.त्यानंतर त्यावर लिंबाचा रस टाकतो आणि शेवटी इनो टाकतो. त्यानंतर तो दोन्ही हात एकमेकांना घासतो आणि हात स्वच्छ धुतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्याच्या हातावरील रंग स्वच्छ होतो. व्हिडीओत तरुण सांगतो की मी नेहमी ही ट्रिक वापरतो. मला पाहून माझ्या शेजारचे लोक सुद्धा हेच करतात. कारण या ट्रिकमुळे कमी वेळात रंग स्वच्छ होतो.

हेही वाचा : लेकीसाठी वडिलांनी केला अनोखा जुगाड! घरच्या घरी चिमुकलीने अनुभवला Amusement park चा थरार, पाहा VIDEO

Masterji_UPWale या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या तरुणाला मेडल द्या.. व्हिडीओ पाहाच” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “यामध्ये थोडे कोलगेट टाकायला पाहिजे होते.” तर एका युजरने लिहिलेय, ” व्हिडीओ पाहून मी खूप प्रभावित झालो.आता या ट्रिकचा फेसवॉश म्हणून वापर करण्याचा मूड आहे” आणखी एका युजरने विचारले “चेहऱ्यावर लावू शकतो का? अनेक युजर्सना या तरुणाचा जुगाड खूप आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून जवळपास सहा हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A guy told easy hack to remove holi color video goes viral on social media ndj
Show comments