Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ थक्क करणारे असतात. तुम्ही मजेशीर पाट्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. कधी पुणेरी पाट्यांचे व्हिडीओ पाहिले असतील तर कधी मजेशीर मेसेज लिहिलेल्या पाट्या हातात घेऊन अनेक तरुण रस्त्यावर उभे असलेले पाहिले असेल. गाडीवर लावलेल्या पाट्या सुद्धा तुम्ही पाहिल्या असतील.
सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की दुचाकीच्या मागे एक स्टिकर लावले आहे आणि एक मजेशीर मेसेज लिहिला आहे. तुम्ही आजवर अनेक मजेशीर पाट्या पहिल्या असतील. पण हा भन्नाट मेसेज वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक दुचाकी दिसेल. या व्हिडिओ एक व्यक्ती दुचाकीच्या मागच्या बाजूला स्टिकर लावताना दिसतो. त्याच्या दुचाकीवर इंग्रजी मध्ये लिहिलेले दिसते, “सॉरी गर्ल्स माय वाइफ इज व्हेरी स्ट्रिक्ट” हा मेसेज पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : प्रवाशाच्या विनंतीवरून पायलटने केली चक्क हिंदीमध्ये अनाउंसमेंट; नेटकरी म्हणाले, “खूप चांगला प्रयत्न केला” VIDEO VIRAL

पाहा व्हायरल व्हिडीओ

baba_craft_design या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओवर अनेक युझर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “स्ट्रिक्ट ऐवजी सुंदर लिहायला पाहिजे होते.” तर एका युजरने लिहिलेय, “असं वाटते की सर्व मुली याच्या मागे पडलेल्या असतात.” आणखी एका युजरने लिहिलेय. “हे लिहिण्यापेक्षा प्रमाणिक राहा.” एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “मुली तर समजेल पण पत्नी सुद्धा तुमच्या मनातील गोष्ट समजेल आणि क्लेश होणार.” एक युजर लिहितो, “स्ट्रिक्ट लिहून सर्व वाया घालवले.” या व्हिडिओवर अनेक युझर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : Kolkata Rape Murder Case : “बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” विराट कोहलीची मागणी? ऐका खऱ्या Video तील वाक्य

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेक तरुण मंडळींच्या दुचाकीच्या मागे भन्नाट मेसेज लिहिलेले दिसतात. काही दिवसांपूर्वी एक फोटो व्हायरल झाला होता. त्या फोटोतील एका दुचाकीच्या मागे एक भन्नाट मेसेज लिहिला होता, “लग्न ही अशी एकमेव जखम आहे, जी होण्याआधी हळद लावतात.” तो फोटो त्यावेळी खूप व्हायरल झाला होता.