Viral Video: सोशल मीडियामुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात; ज्यामध्ये अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यात कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राण्यांमध्ये भांडण वा मैत्री पाहायला मिळते. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण अवाक व्हाल.
आजपर्यंत तुम्ही बिबट्याचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात तो अनेक प्राण्यांवर क्रूर हल्ला करताना दिसला असेल. मात्र, कधी कधी स्वतः रचलेला डाव स्वतःच्याच जीवावर उठतो तेव्हा नक्की काय होतं हे सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलातील रस्त्यावर माकडांचा कळप जमा झाला असून बिबट्या माकडांच्या कळपावर हल्ला करण्यासाठी वेगाने धावत येतो. परंतु, पुढे त्याच्याबरोबर असं काही घडते, ज्याचा त्याने कधी विचारही केला नसेल. या व्हिडीओमध्ये घडल्याप्रमाणे बिबट्या माकडाच्या कळपावर हल्ला करणार इतक्यात माकडांचा कळप बिबट्याभोवती जमा होऊन, त्याच्यावर हल्ला करतो. यावेळी सर्व जण मिळून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही वेळाने बिबट्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माकडांच्या घोळक्यातून पळून जातो.
हेही वाचा: “पोरी, काय नाचतेस गं… “, ‘आज की रात मजा’ गाण्यावरील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच…
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lifeinmix या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर आतापर्यंत लाखो व्ह्युज मिळाल्या असून, त्यावर एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “याला बोलतात टीम वर्क.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बिबट्याची चांगलीच जिरवली.” तर तिसऱ्या युजरने लिहिलेय, “ग्रुप असावा तर असा.”