Viral Photo: सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या असून काही दिवसांपूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. शाळेत काही विद्यार्थी असे असतात, जे खूप छान पेपर लिहून चांगल्या मार्क्सने पास होतात. पण, काही अतरंगी विद्यार्थी असेदेखील असतात जे पेपरमध्ये काहीही लिहितात. अनेकदा अशा विद्यार्थांचे पेपर सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. दरम्यान, आता नुकताच असाच एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एका विद्यार्थ्याचं उत्तरपत्रिकेतील हटके उत्तर पाहून तुम्हालाही हसू येईल.

अनेकदा सोशल मीडयावर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मागील काही दिवसांपासून असे अनेक उत्तरपत्रिकेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशातच आता एका पाचवीच्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे.

ही व्हायरल उत्तरपत्रिका राजस्थान बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (RBSE)मध्ये शिकणाऱ्या एका पाचवीच्या विद्यार्थ्याची आहे. काही दिवसांपूर्वीच येथील शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली असून सध्या सर्व शिक्षक पेपर तपासणी करत आहेत. याचदरम्यान, एका अतरंगी विद्यार्थ्याची हटके उत्तरपत्रिका तपासणीत समोर आली, ज्यामध्ये विद्यार्थ्याचं उत्तर वाचून शिक्षकही चक्रावून गेले.

हेही वाचा: बाबो! पठ्ठ्याने क्षणात शोधून काढलं जमिनीत गाडलेलं गुप्तधन; VIDEO पाहून युजर्सही शॉक

पाहा फोटो:

Social media

या व्हायरल फोटोतील प्रश्नपत्रिकेत बूथ लेवल अधिकारी (बी. एल. ओ.) चा अर्थ काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर विद्यार्थ्याने गमतीशीर उत्तर लिहिलं. ज्यात लिहिलंय की, बी.एल.ओ. हे एका आजाराचं नाव आहे. तर आणखी विद्यार्थ्याने बी. एल.ओ. हे एका औषधाचे नाव आहे असं लिहिलं होतं. सध्या त्या मुलाची उत्तरपत्रिका खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या अनेक उत्तर पत्रिका व्हायरल झाल्या होत्या. ज्यात एकाने उत्तरपत्रिकेत “मला काहीच माहीत नाही, तुम्ही मला याचं उत्तर विचारू नका”, असं लिहिलं होतं; तर दुसऱ्या एकाने त्याच्या उत्तरपत्रिकेत “जय श्री राम” असं लिहिलं होतं, तर आणखी एकाने लिहिलं होतं की, “जय माता दी.”

Story img Loader