Viral Video : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. रांगोळी, दिवे, कपडे, भेटवस्तू, मिठाई इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत आहे. घरोघरी चिवडा, लाडू, चकली इत्यादी फराळाचे पदार्थ बनवणे सुरू आहे. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बहिण तिच्या भावाला चकली बनवण्यास सांगते. त्यानंतर भाऊ चकली बनवतो पण भावाची चकली पाहून ती डोक्याला हात लावते बहिण भावाच्या हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (a hilarious viral video a sister slaps her brother after seeing the chakli he made)
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुणी चकली बनवताना दिसेल. चकली बनवताना ती तिच्या भावाला हाक मारते आणि थोड्या वेळासाठी त्याला चकली बनवायला सांगते. पुढे जेव्हा तिचा भाऊ चकली बनवायला सुरुवात करतो तेव्हा मोठ्या आकाराची चकली तयार करताना दिसतो. तितक्यात बहीण येते आणि त्याला थांब म्हणते आणि ‘चकली केली की चकला केला’ असे विचारते. आणि त्याच्या गालावर एक जोरात मारते. “चकली तुटतच नव्हती म्हणून एवढी मोठी चकली केली” असा भाऊ सांगतो. त्यावर ती म्हणते, “ते आपण स्वत: तोडायची असते. वैतागलेली बहिण भावाला दोन-तीन कानाखाली लगावते आणि त्याला जागेवरून उठायला सांगते. हा व्हिडिओ बघून तुम्हीही पोट धरून असाल. बहीण भावांमधील हे नाते पाहून तुम्हालाही तुमच्या बहीण भावाची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडिओ (Video Viral)
rupeshgauri_official35 या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रुप्याची चकली” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुढच्या दिवाळीपर्यंत खा मोठी चकली” आणखी एका युजरने लिहिलेय, “सणासुदीला तर नको मारत जावा दिदी” एक युजर लिहितो, “कधीतरी भावाची माया पण कर बाई.” तर एक युजर लिहितो, “काही पण म्हणा शेवट जोरात बसली तोंडावर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.