pakistani vadapav girl : वडा पाव खावा तर मुंबईचा. कारण मुंबई आणि वडापावचे अनोखे नाते आहे. मुळात मुंबई ही वडापावसाठी ओळखली जाते. येथील लोकप्रिय फूड स्टॉल म्हणून वडापाव ओळखला जातो. धावपळीच्या आयुष्यात मुंबईकरांची भूक भागवणारा वडापाव कायम चर्चेत येत असतो. देशात अनेक ठिकाणी वडापाव मिळतो पण तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानमध्ये सुद्धा वडापाव मिळतो. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरंय. सध्या एका पाकिस्तानी फूड ब्लॉगरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानातील कराचीमध्ये एक तरुणी वडापाव विकत असल्याचे सांगितले आहे. कराचीमध्ये एक फूड स्टॉल आहे. या फूड स्टॉलचे नाव ‘कविता दीदी का इंडियन खाना’ असे आहे. कविता नावाची महिला तिच्या कुटुंबासह हा फूड स्टॉल चालवते. तिला सर्व प्रेमाने कविता दीदी म्हणतात.
व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी फूड ब्लॉगर करामत खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला हे. या व्हिडीओमध्ये त्यांनी कविताच्या स्टॉलविषयी माहिती सांगितली आहे. कविता फूड स्टॉलवर शाकाहारी आणि मासाहारी दोन्ही प्रकारचे जेवण तयार करते. पाकिस्तानमध्ये हा फूड स्टॉल अतिशय लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे या फूड स्टॉलवरील सर्वात लोकप्रिय पदार्थ पाव भाजी, वडा पाव आणि समोसा आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की कविताच्या स्टॉलवर येणारे लोक तेथील विविध पदार्थांचे कौतुक करताना दिसत आहे. फूड ब्लॉगर सांगतो की या स्टॉलवर हिंदू मुस्लीम एकत्र येऊन खातात.
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की कविता सांगते की मुंबईचा वडापाव खूप लोकप्रिय आहे आणि आता कराचीमध्ये सुद्धा लोकांना वडापाव आवडत आहे.
पाहा व्हिडीओ
karamatkhan_05’s या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फूड ब्लॉगर करामत खानने हा व्हिडीओ शेअर केला असून सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कविता दीदी का इंडियन खाना.. हिंदू कुटुंब वडापाव आणि पावभाजी विकतात” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “ताई,भारतातून खूप सारे प्रेम आणि आदर ” तर एका युजरने लिहिलेय, “मी खाल्ला आहे. खूप छान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “भारतीयांनी हा व्हिडीओ पाहायला पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी सुद्धा शेअर केले आहेत.