सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. लोक प्रसिद्धीसाठी विचित्र डान्स करत असतात, तर कधी स्टंटबाजी करतात. माणसांप्रमाणे प्राण्यांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. कधी प्राण्यांच्या शिकारीचे तर कधी आश्चर्यकारक क्षणांचे व्हिडीओ चर्चेत येत असतात. कधी सिंहाचे, कधी वाघाचे, कधी माकडाचे तर कधी हत्तीचे तर कधी कुत्र्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एका हत्ती आणि कुत्र्याचा सामना झाला आहे. व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
“हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!” अशी हिंदीमध्ये म्हण वापरली जाते ज्याचा अर्थ असा आहे की, जेव्हा हत्ती रस्त्याने जात असतो तेव्हा त्याला पाहून अनेक कुत्रे भुंकतात पण हत्ती त्यांच्याकडे लक्ष देत नाहीथोडक्यात अर्थ असा की, कुत्र्याच्या भुंकण्याला हत्ती घाबरत नाही. सोशल मिडियावर अशीच घटना घडली आहे. .पण प्रत्यक्षात हीच घटना घडली तेव्हा उलटचं घडले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक हत्ती शांतपणे आपल्या वाटेने जात आहे पण रस्त्यावरील कुत्रा त्याच्यावर भुंकताना दिसत आहे. या हत्तीला कुत्र्याचे भुंकणे आवडत नाही. त्यामुळे तो काही क्षण रागातच कुत्र्याकडे पाहतो पण तो कुत्रा तरीही भुंकत राहतो शेवटी हत्ती चिडतो आणि रागात कुत्र्याच्या दिशेने धावत जातो. हत्तीला चिडलेले पाहून कुत्रा देखील चांगलाच घाबरतो आणि घाबरून तेथून पळ काढतो. कुत्रा आणि हत्ती यांच्यातील सामन्याचा एक रोमांचक क्षण व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू येत आहे कारण स्वत:ला गल्लीतील राजा समजणारा कुत्रा भल्या मोठ्या हत्तीवर भुंकत असतो पण जेव्हा हत्ती त्याच्या दिशेने धावतो तेव्हा कुत्रा तेथून पळून जातो. नेटकऱ्यांना कुत्र्याची अवस्था पाहून हसू येत आहे.
येथे व्हिडिओ पहा:
हा व्हिडिओ निवृत्त भारतीय वन सेवा अधिकारी सुसंता नंदा यांनी X वर शेअर केला होता. X वर १७१ लाख फॉलोअर्स असलेले सुसंता नंदा अनेकदा त्यांच्यासाठी मनोरंजक वन्यजीव व्हिडिओ पोस्ट करत असतात. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जर एखाद्याला दृष्टीने (नजरेने) मारता आले असते तर…(हत्तीने रागाने पाहून कुत्र्याला मारले असते.) हत्तीच्या चेहऱ्यावरचे भाव बघा जेव्हा तो रागात कुत्र्याच्या दिशेने धावतो.”
हेही वाचा – जगातील सर्वात उंच महिला कसा करते विमान प्रवास? Viral Video पाहून व्हाल थक्क
व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. लोकांनी कमेंट करत व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेरी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकान म्हटले, “हत्ती २-३ सेंकद विचार करत आहे, हा कुत्र्याचे डोकं ठिकाणावर आहे ना”
तिसऱ्याने लिहिले की, भाऊने (हत्तीने) म्हण चुकीची ठरवली, “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार!”