Viral video: नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ. कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुख:तही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नात आणखी टिकतं. माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशाच एका नवरा बायकोचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, यामध्ये नवऱ्यानं लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला गिफ्ट दिलं आहे. यावर बायकोची प्रतिक्रिया पाहून तुम्हीही म्हणाल नशीब लागतं अशी बायको भेटायला

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला एका नवऱ्यानं बायकोसाठी गिफ्ट आणलं आहे. या नवऱ्याची परिस्थिती गरीब असूनही आहे त्यात बायकोला खूश करण्याचा छोटासा प्रयत्न त्यानं केला आहे. यावेळी त्यानं बायकोला ८० रुपयांचे झुमके आणले आहेत. याठिकाणी गिफ्ट किती किमतीचं आणलं याला किंमत नाही तर ते किती प्रेमानं आणलंय याला किंमत आहे. तसेच यावेळी बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानही पाहण्यासारखं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, हरलेला डावही जिंकता येतो फक्त साथीदार कट्टर पाहिजे..

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर log.kya.sochenge नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये “प्रेमाची किंमत पैशात नसून भावनांमध्ये असते हे सिद्ध करून एका पतीने आपल्या पत्नीला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला ८० रुपयांचे चे कानातले भेट दिले. खरं प्रेम संपत्तीच्या पलीकडे अस्तित्त्वात आहे हे दाखवणारा हृदयस्पर्शी क्षण व्हायरल झाला. महागड्या भेटवस्तूंपेक्षा खरी आपुलकी आणि काळजी महत्त्वाची असते याची आठवण करून देत व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली” असं लिहलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A husband gifted his wife 80 earrings on their anniversary proving love isnt about money but emotions video goes viral srk