Viral Video : नवरा बायकोचे नाते हे जगावेगळे असतात. या नात्यात प्रेम, काळजी जिव्हाळा दिसून येतो. एकमेकांना सहकार्य करुन आणि एकमेकांना समजून घेऊन हे नातं अधिक दृढ होत जाते. आज महिला प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा लावून काम करताहेत. अशावेळी पुरुष सुद्धा पत्नीला घरकामात मदत करताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण बायकोला मदत करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा तरुण गावातील असून चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या बायको शेजारी बसून पोळ्या लाटताना दिसत आहे. गावातील या तरुणाचा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

असं म्हणतात, पुरुष स्त्री समानता ही फक्त शहरी भागातच स्वीकारली गेली आहे. आजही अनेक गाव-खेड्यात महिला आणि पुरुषमध्ये असमानता दिसून येते. गावागावात पुरुषप्रधान परंपरा दिसून येते. आजही गावातील बहूतेक पुरुष महिलांना घरकामात मदत करत नाही पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये हा तरुण पत्नीला मदत करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओ स्वयंपाकघरातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पती पत्नी चुली शेजारी बसलेले आहेत. पत्नी गव्हाच्या पीठाचे गोळे करुन देत आहे तर पती पोळ्या लाटताना दिसत आहे. त्यानंतर पत्नी या पोळ्या तव्यावर भाजताना दिसत आहे. दोघांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणि समाधान दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना वाटेल की नवरा असावा तर असा.

'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक
Woman wash hair with toxic foam in Yamuna river video viral
“अहो ताई, तो शॅम्पू नाही” यमुना नदीत महिलांचा किळसवाणा प्रकार; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी मारला कपाळावर हात
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

हेही वाचा : जुगाड असावा तर असा! क्रिएटिव्हीटी वापरुन बनवले वृत्तपत्रापासून सुंदर पोशाख, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

waghmode_kondiram या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गावठी पोरं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “खूप छान काम करता येतो राव” तर एका युजरने लिहिलेय, “इन्स्टाग्रामवरील सर्वात सुंदर व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “असा नवरा पाहिजे” अनेक युजर्सनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे तर काही युजर्सनी त्यांच्या नवऱ्याविषयी तक्रारी केल्या आहेत.