कल्पना करा, तुमच्या हातात गरम चहा किंवा कॉफीचा कप घेऊन तुमच्या खिडकीजवळ बसून पावसाने भिजलेल्या शहराकडे पाहात आहात. काही वेळाने भूक लागते आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी घरी स्वयंपाक करण्याऐवजी बाहेरून जेवण मागवू या असा विचार तुमच्या मनात पटकन येतो. तुम्ही मोबाईल अॅपवरून पटकन काहीकरी ऑर्डर करता. थोड्या वेळाने, तुमची ऑर्डर वेळेवर घरी पोहोचते, जी डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात भिजत पोहचवतो.
ग्राहकांना वेळेवर ऑर्डर पोहचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय कधी पावसात, कधी उपाशीपोटी काम करत असतात. पावसाळ्यात मेट्रो शहरांमध्ये अशी परिस्थिती सामान्य आहे
डिलिव्हरी बॉयसाठी सुरू केलं रिलॅक्स स्टेशन
. हवामानाची स्थिती कितीही गंभीर असली, पाऊस किंवा कडक ऊन असले, तरी डिलिव्हरी बॉयला लोकांच्या ऑर्डर वेळेवर त्यांच्या दारापर्यंत पोहोचवाव्या लागतात. म्हणूनच सिद्धेश लोकरे नावाच्या कंटेंट क्रिएटरने मेहनती डिलिव्हरी बॉयसाठी मिनी रिलॅक्स स्टेशन तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्टॉलमध्ये चहा, समोसे आणि नाश्ता आणि एजंटांसाठी रेनकोटही मोफत मिळतात.
हेही वाचा – आरती ऐकून टाळ्या वाजवू लागले उंदीरमामा! भक्तीमय व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क
हेही वाचा –मासे पकडण्यासाठी हटके जुगाड! छत्री उघडली, पाण्यात टाकली अन्….पाहा व्हायरल व्हिडीओ
समोसा-चहा-पाणी अन् रेनकोट देतोय मोफत
सिद्धेश एक सोशल मीडिया इन्सफ्युएन्सर आहे. त्या सुरू केलेल्या उपक्रमाबाबत माहिती देता त्या इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहले की, मी भारताच्या खऱ्या हिरोंसाठी एक रिलॅक्स स्टेशन तयार केले आहे! हे रिलॅक्स स्टेशन आमच्या डिलिव्हरी नेटवर्कद्वारे दाखवलेल्या सर्व प्रयत्नांचा आणि शौर्याचा पाया आहे जे आम्हाला आराम आणि फुड डिलिव्हरी देण्यात कधीही चुकत नाहीत. तरीसुद्धा, या लोकांबरोबर संवाद साधताना, त्यांनी त्यांच्या नोकरीसाठी जोपासलेली अभिमान आणि उत्कटता मला जाणवली. पावसाळा असो की उन्हाळा असो ते जे करतात ते करायला त्यांना आवडते. हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आमचा सामूहिक सलाम आहे.’
सिद्देशचा हा उपक्रम आणि ही पोस्ट लोकांनाही खूप आवडली, लोक या उपक्रमाचे कौतुक करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांसाठी लोकांनी त्यांचे आभार मानले.