Viral Video : आयुष्य म्हटले की, संघर्ष आलाच. संघर्ष कुणालाच चुकला नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील लहान मुलाचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. या व्हिडीओत एक लहान मुलगा पायाला गंभीर दुखापत असतानाही रस्त्यावर की-चेन विकत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक लहान मुलगा ट्रॅफिक सिग्नलवरून जाणाऱ्या गाडीमालकांना की-चेन विकण्यासाठी फूटपाथवर बसला आहे. विशेष म्हणजे या मुलाच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झालीय. पण, त्याही अवस्थेत तो दुखापतीवर प्लास्टिक व कापड गुंडाळून पोटाची खळगी भरण्यासाठी की-चेनची विक्री करतोय.हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. गुजरातच्या अहमदाबाद येथील हा व्हिडीओ असल्याचे मानले जातेय.
हेही वाचा : शरद पवार यांना ‘या’ गुगलीमुळे अपयश, ज्योतिषतज्ज्ञांचे मोठे विधान; म्हणाले, “बुद्धिमत्ता खर्ची…”
sj.artsylens या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, त्यावर लाखो लाइक्स आणि व्ह्युज आले आहेत. हा व्हिडीओ पाहून युजर्स भावनिक झाले आहेत. एका युजरने लिहिलेय- ‘भावा तुझ्या या मेहनतीमुळे तुझे भविष्य उज्ज्वल राहील.’ तर एका युजरने लिहिलेय, ‘तो पैसे कमावतोय; भीक मागत नाही. मला त्याच्यावर दया येत नाही; तर त्याविषयी आदर वाटतो.’ अनेक युजर्सनी या लहान मुलाला आशीर्वाद दिला आहे आणि त्याचा पाय लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना केली आहे.