Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ इतर विचित्र असतात की पाहून कोणीही अवाक् होईल. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ शेअर केले जातात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्हिडीओत दाखवलेले दृश्य कदाचित तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहाल. नेमकं काय दाखवले आहे, हे तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसेल. (a newlywed bride said a beautiful ukhana for husband video goes viral on social media)

चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक व्यक्ती गाडी चालवत आहे आणि त्याच्या गाडीवर एक दोन नव्हे तर असंख्य लोक बसलेले आहे. एवढे लोक बसलेले आहेत की आपण मोजू सुद्धा शकत नाही. काही लोक गाडीच्या छतावर बसलेले दिसत आहे, काही लोक गाडीच्या बोनटवर बसलेले आहे तर काही लोक गाडीच्या आजुबाजूला लटकून प्रवास करत आहे. विशेष म्हणजे एवढे लोक बसून सुद्धा ड्रायव्हर नीट गाडी चालवत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल.

हेही वाचा : Anand Mahindra: अहो, थांबा! परदेशी नागरिकाचा ‘जुगाड’ पाहून आनंद महिंद्रा झाले थक्क; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाले, ‘आमचा मुकुट…’

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”

ghantaa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ड्रायव्हर जीवंत आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “ड्रायव्हर गुगल मॅप पाहून गाडी चालवत आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “५५ पेक्षा जास्त लोक आहेत” काही युजर्स हा व्हिडीओ मध्य प्रदेश येथील असल्याचा दावा करत आहे तर काही लोक व्हिडीओ बांगलादेशीमधील असल्याचा दावा करत आहे. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी हे भारतातच घडू शकते असे लिहिलेय. मुळात व्हिडीओ नेमका कुठला आहे, याविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही तरी सुद्धा सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा आहे.

Story img Loader