Viral Video: प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळण्याची अपेक्षा फारच कमी असते. पण, एका महिलेला तिची हरवलेली एक मौल्यवान वस्तू अगदीच खास पद्धतीने परत मिळाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. एक महिला तिच्या सुट्ट्यांदरम्यान केरळला फिरायला जाते. या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर तिचा आयफोन हरवतो. पण, नंतर तिला हा आयफोन अगदीच खास पद्धतीत मिळतो. नक्की काय घडलं ते या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.

तर गोष्ट अशी आहे की, कर्नाटकची पर्यटक तिच्या सुट्ट्यांदरम्यान केरळला फिरायला गेली होती. या सहलीदरम्यान तिचा आयफोन समुद्रकिनाऱ्यावर हरवला. अनेकदा प्रयत्न करून तिला आयफोन काही मिळाला नाही. पण, नंतर केरळच्या अग्निशमन आणि बचाव पथकासह अँटिलिया चालेट (Antiliya chalet) टीम आयफोन शोधण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहचली. आयफोन फोन परत मिळवण्यासाठी अवघे तास प्रयत्न करण्यात आले आणि अखेर आयफोन शोधण्यात टीम यशस्वी झाली. कर्नाटकच्या पर्यटक महिलेला आयफोन परत कसा मिळाला, केरळच्या टीमने आयफोन कसा शोधून काढला हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…टाकाऊपासून टिकाऊ! जुन्या मायक्रोवेव्ह ओव्हनचा केला ‘असा’ उपयोग की… VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

व्हिडीओ नक्की बघा…

कर्नाटकात राहणाऱ्या एका महिलेचा एक लाख ५० हजार रुपये किमतीचा आयफोन समुद्रकिनाऱ्यावरील मोठ्या खडकांमध्ये पडला होता. अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना आयफोन सापडला नाही. वारा आणि पावसामुळे समुद्रकिनाऱ्यावरील जोरदार लाटांमुळे परिस्थिती आव्हानात्मक होत चालली होती आणि आयफोन काही केल्या सापडत नव्हता. तेव्हा केरळच्या अग्निशमन आणि बचाव पथकासह अँटिलिया चालेट (Antiliya chalet) टीमने आयफोन शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि ही टीम आयफोन शोधण्यात यशस्वी झाली.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अग्निशमन आणि बचाव पथक समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या खडकांमध्ये अगदीच मेहनतीने आयफोन शोधत आहेत. तसेच आयफोन मिळाल्यावर त्यांनी तरुणीबरोबर एक फोटोदेखील शेअर केला आहे. महिला पर्यटक ट्रीपदरम्यान @antiliyachalets या हॉटेलमध्ये राहिली होती. तर याच हॉटेलच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तरुणीचा आयफोन शोधून दिल्याबद्दल केरळ अग्निशमन आणि बचाव पथकाचे हॉटेल कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहेत.