सध्याच्या काळात अनेकजण वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करुन रील बनवतात आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. शिवाय या रिल्सचं वेड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये पाहायला मिळतं. अशी रिल्स पाहून आपलंही मनोरंजन होतं. पण सध्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला मात्र असं रील बनवणं चांगलच महागात पडलं आहे. कारण या महिला कॉन्स्टेबलने पोलिसांच्या खाकी वर्दीत म्हणजेच गणवेश परिधान करून रील बनवलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं, यामुळे तिचं निलंबन करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एका महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पोलिसांचा गणवेश घालून रील बनवत आहे. यावेळी ती “तेरी मेरी दोस्ती प्यार में बदल गई” या गाण्यावर रील बनवताना दिसत आहे. या महिला कॉन्स्टेबलने केलेलं रील व्हायरल होताच एसपींनी तिचं निलंबन केलं आहे.

Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप

हेही वाचा- Video: उत्तर प्रदेशच्या जोडप्याची अनोखी गोष्ट! बायको बसचालक, तर नवरा कंडक्टर…

कासगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया सेलद्वारे व्हिडिओचा तपास करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील सहावर पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबल आरती सोलंकी यांनी बनवलेल्या रीलची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्यात आलं. शिवाय विभागीय कार्यवाही सुरू केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. सांगितले जात आहे की, महिला पोलीस कर्मचाऱ्याने इन्स्टाग्रामवर एक अकाऊंट बनवलं आहे, ज्यामध्ये पोलीस वर्दीमध्ये डान्स केल्याचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कासगंज पोलिसांनी त्याची दखल घेत महिला कॉन्स्टेबलचे तत्काळ निलंबित केले. शिवाय सध्या आरती सोलंकी यांनी बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

अमित नावाच्या युजरने लिहिलं, “हे मनोरंजन आहे, गुन्हा नाही, लहान मुलं आहेत, नोकरीच्या तणावपूर्ण वातावरणात जर कोणी आनंदी राहात असेल तर आनंदी राहू द्या.” दुसऱ्याने लिहिलं, “पोलिसांच्या गणवेशात रील बनवण्यावर बंदी असेल तर हे लोक कायद्याचे पालन का करत नाहीत? त्यांनाच त्यांच्या नोकरची काळजी नसेल तर आपण काय करणार?”

Story img Loader