Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुले कधी डान्स करताना तर कधी गाणी म्हणताना दिसतात. सध्या असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली चक्क रोटी लाटताना दिसतेय. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर खेळतानाचे किंवा मजा मस्ती करतानाचे लहान मुलांचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा बघितले असेल पण तुम्ही कधी लहान मुलांना रोटी बनवताना कदाचित पहिल्यांदाच पाहाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये चिमुकली खाली बसून छोट्या छोट्या रोटी लाटताना दिसत आहे. चिमुकली अगदी मनापासून रोटी लाटताना दिसत आहे. इतक्या कमी वयात तिला रोटी लाटताना पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : याला म्हणतात खरी कला! डोळे झाकून फिरत्या चाकावर साकारलं मातीचे भांडं, व्हिडीओ होतोय व्हायरल

gulshan.khurana.7370 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस मुलगी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “एवढ्या गोल चपात्या तर मी सु्द्धा बनवू शकत नाही.”आणखी एका युजरने लिहिलेय, “चिमुकली खूप चांगल्या रोटी बनवत आहे. खरंच खूप भाग्यवान असतात ते आई वडील ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात.”