Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या मराठमोळ्या तरुणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या तरुणाने त्याच्या मस्टँग या आलिशान कारवर चक्क फॉलोअर्सची नावे लिहिली आहे. हा तरुण सध्या कॅनेडामध्ये राहतो. त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती सांगितली आहे.

असं म्हणतात, “जगात भारी कोल्हापुरी” या तरुणाने हे सिद्ध करून दाखवले त्याने त्याच्या मस्टँग या आलिशान कारवर चक्क फॉलोअर्सची नावे लिहिली आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो सांगतो, “मी मस्टँगवर आपल्या फॉलोअर्सची नावं लिहित आहोत. ही जगातील पहिली अशी मस्टँग आहे, ज्यावर तुमचे नाव असणार आहे. त्यासाठी तु्म्हाला तीन गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे मला फॉलो करा, दुसरे म्हणजे तुमचं नाव कमेंटमध्ये आणि तिसरे म्हणजे हा व्हिडीओ शेअर करा. काय माहित आपला वर्ल्ड रेकॉर्डचा दौर येईल.त्यामुळे ही संधी सोडू नका. कारण आधीपासूनच कॅनडामध्ये आपल्या या ट्रेंडची चर्चा व्हायला चालू झाली आहे.”

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Amarnath Yatra Bus Break Fail
VIDEO: घाटात ब्रेक फेलचा थरार; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या, जवानांनी असे वाचवले ४० अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Raj Thackeray Fatwa
“मुस्लीम समाजातील ‘त्या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे नेत्याची मागणी!
Sudha murthy rajyasabha speech in marathi
Sudha Murthy in Rajyasabha : राज्यसभेतील सुधा मूर्तींच्या पहिल्याच भाषणाची तुफान चर्चा, ‘या’ दोन मागण्यांकडे लक्ष वेधल्याने सोशल मीडियावर कौतुक!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

हेही वाचा : टिंडरवरून डिनर डेट करणं युवकाला पडलं महाग; जेवणांचं बिल झालं ४४ हजार, नेमका प्रकार काय?

पाहा व्हायरल व्हिडीओ

कोण आहे हा तरुण?

गौरव मु़डेकर असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा कोल्हापूरचा असून सध्या नोकरीसाठी कॅनडामध्ये राहतो. त्याचे इन्स्टाग्राम आणि युट्युबवर हजारो फॉलोअर्स आहेत.तो इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर युजर्स भरभरून प्रतिसाद देतात. कोल्हापूरच्या या तरुणाने अनोख्या पद्धतीने त्याच्या फॉलोअर्सचे मन जिंकले आहे.

हेही वाचा : VIDEO: घाटात ब्रेक फेलचा थरार; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या, जवानांनी असे वाचवले ४० अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण

gm_vlogs_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गौरवनी हा व्हिडीओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गाडी भरत आली आहे. केली का तुम्ही comment?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जोतिबा, महालक्ष्मी, बाळूमामा च्या नावानं चांगभलं” तर एका युजरने लिहिलेय, “कोल्हापुरकरांच ढीग प्रेम” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “गाडीवर नाव तर ठीक आहे…. पण तेवढं नावावर गाडी केली असती तर फर्स्ट क्लास काम होईल..” अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये त्यांचे नाव लिहिलेय. काही युजर्सनी या तरुणाच्या या कामाचे कौतुक केले आहेत.