Viral Video : सोशल मीडियावर पुराच्या पाण्यात वाहून जाणारे अनेक लोकांचे व्हिडीओ तुम्ही आजवर पाहिले असेल. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एका पुरुषाचा जीव वाचवते. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. महिलेच्या प्रयत्नामुळे एका माणसाचा जीव वाचतो. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (a lady saved drowning man with the help of odhani video goes viral on social media)
महिलेचे कौतुक करावे तितके कमी
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला ओसांडून वाहणारे पुराचे पाणी दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहत आहे पण तितक्यात एक महिला धावून येते आणि ओढणी या पुराच्या पाण्यात वाहणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने फेकते. ती व्यक्ती लगेच ती ओढणी हातात पकडते आणि त्या ओढणीच्या मदतीने त्या व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढले जाते. एका महिलेने केलेल्या मदतीमुळे एका पुरुषाचा जीव वाचतो. सध्या या महिलेचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले जात आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
the_ultimate_trolls_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “राणी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी महिलेनी दाखवलेल्या धाडसीपणाचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “ती राणी आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “जिथे माणुसकी येते तिथे लिंगभेद करू नये” आणखी एका युजरने लिहिलेय, “महिलेचे कौतुक करावे तितके कमी आहे” एक युजर लिहितो, “मला वाटते हा व्हिडीओ उत्तराखंडचा आहे.” तर एक युजर लिहितो, “कॅमेरामॅन नेमका कुठे आहे, हे मला कधीच कळत नाही.”
यापूर्वी सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या अनेक घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येतात. अनेकदा लोकांनी त्यांच्या निष्काळजीपणामुळे प्राण सुद्धा गमावले आहे तर काही वेळा इतर लोकांनी केलेल्या मदतीमुळे काही लोकांचे प्राण सुद्धा वाचले आहेत.