VIDEO : काही लोकांना हॉरर चित्रपट बघायला आवडतो तर काही लोकांना हॉरर चित्रपट बघण्याची खूप भीती वाटते. अनेक जण भीत भीत हॉरर चित्रपट बघतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत ही महिला टिव्हीसमोर खुर्चीवर बसून हॉरर चित्रपट बघताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत असे काही होते की महिला थेट खूर्चीवरुन खाली पडते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ एका घरातील असून ही महिला टिव्हीसमोर बसून हॉरर चित्रपटाचा आनंद घेताना दिसत आहे. ती चित्रपट बघण्यात इतकी मग्न झाली आहे की आजुबाजूला काय सुरू आहे, याकडे तिचे लक्ष नाही.
एक तरुण तिच्या मागे बसलेला असतो. तो हळूच किचेनमध्ये जातो आणि ताट आणि चम्मच घेऊन येतो. चित्रपटात खूप भयावह सीन सुरू असतो. अशावेळी तो जोरात ताटावर चमचा वाजवतो आणि अचानक आवाज आल्याने हॉरर चित्रपट बघत असेलेली महिला खूप घाबरते आणि खुर्चीवरुन खाली पडते. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप हसायला येईल.

हेही वाचा : चिमुकल्याने चंद्रा गाण्यावर केली अप्रतिम लावणी, व्हिडीओ पाहून येईल अमृता खानविलकरची आठवण

the_bawaal या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “भावा हार्ट अटॅक येऊ शकतो. अशी मजा करू नका” तर एका युजरने लिहिलेय, “बहिण घाबरली…”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A lady watching horror movie on tv at home a young man make funny prank video goes viral ndj
Show comments