Viral Video: साप, अजगर म्हटलं की, अनेकांच्या अंगावर काटा येतो. साप आपल्या आसपास असल्याचा चुकून भास जरी झाला तरी आपल्याला दरदरून घाम फुटतो. असेच सापांचे विविध व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्यासमोर येतात. दरम्यान, अशाच एका अजगराचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; ज्यात तो चक्क चालू गाडीच्या खाली अडकलेला असून, तिथून बाहेर पडण्यासाठी तो बराच प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाहून युजर्स त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील अलाबामा महामार्गावरचा असून, या व्हिडीओच्या सुरुवातीला या महामार्गावरून एक पांढऱ्या रंगाची कार जाताना दिसत आहे. या कारच्या खालच्या बाजूला निरखून पाहिल्यानंतर एक भलामोठा अजगर स्वतःला सोडविण्याचा अतोनात प्रयत्न करताना दिसतोय. पण, बराच प्रयत्न करूनही तो स्वतःची सुटका करू शकला नाही. या अजगराला पाहून व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ आणखी झूम केला.

हेही वाचा : किती मोठे धाडस! जंगल सफारीत दिसले सिंहाचे पिल्लू; पठ्ठ्याने जवळ जाऊन काढला व्हिडीओ

पाहा व्हिडीओ :

व्हायरल होणारा हा व्हिडीओ मार्क थॉर्न नावाच्या व्यक्तीने काढला असून, तो X (ट्विटर)वरील @WMCActionNews5 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास चार हजारहून अधिक व्ह्युज मिळाले असून, अनेक जण यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका व्यक्तीने कमेंटमध्ये या अजगराबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “किती भयानक अजगर आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A large python stuck in the back wheel of a car the end of the thrilling video will not believe the eyes sap
Show comments