सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात आपणाला प्राण्यांशी संबंधित अनेक मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळतात. खरं तर, इतर प्राण्यांच्या तुलनेत शिकारीच्या बाबतीत फार कमी प्राणी जंगलाच्या राजाशी सामना करतात. कारण सिंहाने एखाद्या प्राण्याला आपल्या जबड्यात पकडलं तर त्याचं जिवंत राहणं अशक्य असतं. सिंहाच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या एका सिंहाने चक्क कॅमेरा पळवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील जे जंगलात फिरणाऱ्या फोटोग्राफर्सनी शूट केलेले असतात. असे वन्यजीव फोटोग्राफर नेहमीच जंगलातील प्राण्यांशी संबंधित महत्वपूर्ण आणि नवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते कधी स्वतः प्राण्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करतात किंवा ठिकठिकाणी कॅमेरे लावतात, जेणेकरून प्राण्यांच्या हालचालीची शूट करता येऊ शकतात.
मात्र, वन्यजीव फोटोग्राफरने लावलेला कॅमेराच एखाद्या प्राण्याने चोरून नेला तर काय होऊ शकतं आणि आपणाला किती अविश्वसनीय गोष्टी पाहता येऊ शकतात याचा अंदाज लावता येऊ शकत नाही. पण सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंहाने एक कॅमेरा पळवल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वन्यजीव फोटोग्राफरने जंगलात कॅमेरा बसवला होता, जेणेकरून प्राण्यांच्या हालचाली रेकॉर्ड करता येतील. मात्र, एखादा सिंह आपला कॅमेरा घेऊन जाईल याची कल्पना देखील या फोटोग्राफरने केली नसेल.
सिंह कॅमेरा नेला पळवून –
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, सिंह जंगलात फिरत असताना त्याची नजर कॅमेऱ्यावर पडल्याचं दिसत आहे. सिंह कॅमेऱ्याच्या दिशेने येतो, सुरुवातील कॅमेरा फिरताना पाहून सिंह घाबरतो. मात्र, नंतर तो तोंडात धरुन तेथून पळून जातो. सिंह तोंडात कॅमेरा घेऊन खूप दूर जातो आणि एका ठिकाणी तो थांबतो आणि कॅमेरा खाली ठेवतो. थोडा आराम करुन पुन्हा तो कॅमेरा तोंडात धरुन सिंह पळतो. तर व्हिडीओत पुढे सिंह एका ठिकाणी कॅमेरा ठेवून निघून गेल्याचंही दिसत आहे. दरम्यान, काही त्यानंतर काही फोटोग्राफरने कारमधून येतात आणि कॅमेरा घेऊन निघून जातात. सिंहाने कॅमेरा पळवल्याचा मजेशीर आणि तेवढाच अप्रतिम व्हिडिओ @yourclipss नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.