सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. कुत्र्यांपासून माजरींपर्यंत, पक्ष्यांपासून जंगली प्राण्यांपर्यंत विविध प्राण्यांचे व्हिडीओ आपण नेहमी पाहतो. काही व्हिडीओ पाहून आपल्या अंगावर काटा येतो तर काही व्हिडीओ पाहून आपल्या खळखळून हसण्यास भाग पाडतात.
सध्या असाच एका मांजरीचा आणि चिमणीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहे. एका मांजरीचा आणि चिमणीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहे. खरंतर चिमणीच्या लक्षात येते की ती संकटात सापडली आहे पण तरीही ती धीर सोडत नाही. अत्यंत धैर्याने ती मांजरीचा सामना करते.
व्हिडीओमध्ये तीन मांजरीच्यामध्ये एक चिमणी अडकली होती, पण स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिने जी काही शक्कल लढवली आहे ते पाहून तुम्ही खरचं आश्चर्यचकीत होऊन जाल. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका चिमणी तीन मांजरांच्या मध्ये अडकली आहे. पण तीन मांजर आसपास असूनही ती जराही घाबरलेली दिसत नाही. सुटका करून घेण्यासाठी धडपडताना दिसत नाही. उलट ती पुतळ्यासारखी एकाच जागी स्तब्ध उभी राहिली. तिन्ही मांजरी एकापाठो पाठ एक तिच्या जवळ येत आहेत आणि तिचा वास घेत आहेत, तिला पंजाने स्पर्श करत आहे पण तरीही ती आजिबात हालचाल करत नाही आणि मुर्तीसारखी तशीच उभी राहते. तिन्ही मांजरी तिच्या भोवती गोल गोल फिरत आहे. जशी मांजरी तिच्यापासून थोड्या दूर जातात तशी संधी साधून तेथून चिमणी लगेच पळ काढते. मांजरी तिला पकडण्याचा प्रयत्न करतात पण ती त्यांच्या हाती लागत नाही.
हेही वाचा – मस्करी करता करता मित्राला उंच खडकाच्या टोकावरून खाली लटकवलं; पण पुढं असं काही घडलं की…Video पाहून व्हाल थक्क
हेही वाचा – तुम्ही कधी असा विचित्र आवाज ऐकलाय का? ‘या’ पक्ष्याचे ‘असूरी हास्य’ ऐकून बसेल धक्का! पाहा Viral Video
व्हिडीओमध्ये चिमणीची हुशारी पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आयुष्यात कितीही संकट आले तरी त्याचा असा धैर्याने सामाना केला पाहिजे हीच या व्हिडीओतून मिळणारी शिकवण आहे. लोकांनी हुशार चिमणीच्या धैर्याचे प्रचंड कौतूक वाटत आहे. वायरल हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ gunsnrosesgirl3 च्या नावाने शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ६५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. एकाने लिहिले, “हुशार चिमणी!” दुसऱ्याने लिहले,” कमाल! बुद्धीचा वापर केला”.