Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ थरकाप उडवणारे असतात तर काही भावुक करणारे असतात. काही लोक त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव शेअर करतात तर काही लोक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर एका चिमुकल्याशी संवाद साधताना दिसत आहे. हा चिमुकला आजारी आहे. त्याच्याशी बोलताना त्या व्यक्तीला कळते की त्या चिमुकल्याला ब्लड कॅन्सर आहे. ब्लॅड कॅन्सरनी ग्रस्त असलेल्या या चिमुकल्याबरोबरचा संवाद सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –
एक व्यक्ती रस्त्यावर उभ्या असलेल्या एका चिमुकल्याबरोबर संवाद साधताना दिसते.
व्यक्ती – काय नाव आहे तुझं
चिमुकला – मनीष भंडारी
व्यक्ती – तुला काय झालं?
चिमुकला – मला माहिती नाही. माझ्या वडीलांना माहिती आहे.
व्यक्ती – तुझ्या वडीलांना माहिती आहे?
चिमुकला होकारार्थी मान हलवतो.
त्याचे वडील – डॉक्टर म्हणाले BND करावी लागेल
व्यक्ती – BND काय असते?
त्यानंतर ते रस्त्याच्या बाजूला जातात आणि बोलतात. तेव्हा त्या व्यक्तीला कळते की त्या चिमुकल्याला ब्लड कॅन्सर आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही व्यक्ती
त्या चिमुकल्याचा लाड करते. त्याला गिफ्ट देते. एवढंच काय तर वडीलांना पैसे देते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर कोणतेही टेन्शन नाही. तो अत्यंत आत्मविश्वासू आणि मानसिकदृष्ट्या खंबीर दिसतोय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
त्या व्यक्तीचे नाव हुसैन मन्सुरी असून ते गरीबांना व गरजूंना मदत करतात. त्यांनी त्यांच्या iamhussainmansuri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनध्ये लिहिलेय, “चिमुकला मनीष ब्लड कॅन्सरनी ग्रस्त आहे. पाहा मानसिकदृष्ट्या तो किती खंबीर आहे. कृपया हा चिमुकला लवकर बरा व्हावा, म्हणून प्रार्थना करा.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भारताला खरंच अशा लोकांची गरज आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “किती गोंडस मुलगा आहे. मला खरंच या व्यक्तीला सलाम करावासा वाटतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाणी डोळ्यात पाणी आले. भावुक करणारा व्हिडीओ. देवा या चिमुकल्याला लवकर बरे कर” अनेक युजर्सनी या चिमुकल्यासाठी प्रार्थना केली आहे.