Viral Video : सध्या दिवाळीच्या संपल्या आणि सर्व जण गाव, घर सोडून शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी परत जात आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ‘आपल्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्यावरच्या रीलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला बालकलाकार साईराज केंद्रे दिवाळीच्या सुट्ट्यानंतर घर सोडून जाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये साईराज आईला मिठी मारून रडताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही रडू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की साईराज आईला मिठी मारून रडत आहे. आईला सुद्धा रडताना दिसत आहे. त्याला निरोप द्यायला आजूबाजूचे लोक सुद्धा आलेले आहेत. व्हिडीओत पुढे त्याची आई त्याचे डोळे पुसताना दिसते. तरीसुद्धा चिमुकल्या साईराजचे रडणे थांबत नाही. त्यानंतर तो स्वत:च डोळे पुसतो आणि स्मित हास्य करतो. सध्या हा भावुक करणारा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

पाहा व्हायरल व्हिडीओ

ganeshkendre7707 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर “दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आईला सोडून राहण्याचा पहिला प्रवास सुरू झाला”

हेही वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा अंताक्षरीत तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही… ‘म’ अक्षरावरून गायलं गाणं, तरुणीच्या आवाजाने नेटकऱ्यांना लावलं वेड

u

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अरे येडू कोणाला आवडत आपल्या आईला सोडून जायला पण बाळा तुझं काम खुप छान आहे तु तुझ्या आई बाबा पण खुप लाडका आहे आणि आम्हा सर्वांनचा पण” तर एका युजरने लिहिलेय, “नको रडूस साईराज तुला बघून मला पण रडू येते रे बाबा” आणखी एका युजरने लिहिलेय, “साई तुला पहिल्यांदाच रडताना पाहिलंय.. तु एक हिरा आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळा तू खुप लहान आहेस.. पण हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय किंमत नसते बाळा तू खुप नशीबवान आहेस… तु या वयात संघर्ष करतोय स्वतःला सिद्ध करण्यासाठी.. आणि लक्षात ठेव तुझी सुरुवातच त्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पा च्या गाण्यानं झाली, तो तुला कधीच एकटा सोडणार नाही…… खुप मोठा हो..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A little boy leaving home cried hugging his mother after diwali holidays are over mother son emotional video goes viral ndj