Viral Video : सध्या देशभरात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. सगळीकडे गणपतीच्या नावाचा जयजयकार केला जात आहे. ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. घरोघरी बाप्पाासाठी लाडू मोदक तयार केले जात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण बाप्पााच्या उत्सवात सहभागी झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर गणेशोत्सवाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली उकडीचे मोदक तयार करताना दिसते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (a little child girl made a tasty ukdiche modak for Ganpati bappa)

चिमुकलीने बनवले बाप्पासाठी सुंदर मोदक

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली मोदक भरताना दिसत आहे. ती उकडीचे मोदक तयार करत आहे. तिने खूप चांगल्या पद्धतीने मोदकामध्ये सारण भरले आहे आणि मोदकाला कळा पाडल्या आहेत. व्हिडीओत पुढे चिमुकली तिने तयार केलेला मोदक सर्वांना दाखवते. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “मूर्तीजवळ उभे राहून स्वतःला मालक समजू नका” कार्यकर्त्यानं रस्त्यावरच्या गरिबाला थेट लाथेनं उडवलं; VIDEO पाहून सांगा चूक कुणाची

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Pune Video : पुण्यातील सर्वात सुंदर देखावा पाहिला का? साकारले पंजाबमधील सुंदर दुर्गियाना मंदिर, व्हिडीओ एकदा पाहाच

cutelittle_saanj या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सांज ने बनवले बाप्पासाठी मोदक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “संस्कार ही अशी गोष्ट आहे किती पैसे असले तरी तुम्ही खरेदी करू शकत नाही आणि ते संस्कार फक्त रक्ताच्या नात्यातूनच मिळू शकतात ते रक्ताचे नातं म्हणजे आई वडील.” तर एका युजरने लिहिलेय, “किती छान केलाय ग मोदक… लाडूबाई….” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती सुंदर पद्धतीने तिने मोदक बनवलेत जशी काय खूप वर्षाचा अनुभव आहे आणि त्यात तिची ती खूप हलकीशी गोड स्माईल परत परत व्हिडीओ बघायला भाग पाडते. लव्ह यू बेटा. खूप मोठी हो.” अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A little child girl made a tasty ukdiche modak for ganpati bappa video goes viral on social media ndj