Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुले मजा मस्ती करताना दिसतात तर कधी डान्स करताना दिसतात प.ण कधी तुम्ही लहान मुलांना पुश अप्स करताना पाहिले का? जर नाही तर हा व्हिडीओ नक्की पाहा.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकली पुश अप्स करताना दिसत आहे. पुश अप्स करताना हाताला खांद्याच्या सरळ रेषेत जमीनीवर ठेवावे आणि पाय सरळ ठेवावे. शरीराचा संपूर्ण भार हाताच्या पंज्यावर आणि बोटांवर उचलावा. ही चिमुकली सुद्धा असंच करताना दिसतेय. या चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोक या चिमुकलीला पुश अप्स करताना पाहून अवाक् होतील.
व्हायरल व्हिडीओ
हा व्हायरल व्हिडीओ एका जिममध्ये शूट केला आहे. व्हिडीओत एक चिमुकली गुलाबी रंगाचा फ्रॉक घालून पुश करताना दिसत आहे. ती खूप गोड दिसतेय. या चिमुकलीच्या बाजूला एक तरुण बसलेला आहे.कदाचित या तरुणाची ही मुलगी असावी. तो तिला प्रोत्साहन देताना दिसत आहे. याशिवाय जिममध्ये अनेक जण आहेत जे या चिमुकलीला पुश अप्स करताना कौतुकाने पाहत आहे. काही लोक या चिमुकलीचा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. या चिमुकलीला पुश अप्स करताना पाहून तुम्हीही भारावून जाल.
हेही वाचा : Viral News : स्टेडियममध्ये बसून आयपीएलची मॅच नव्हे तर ‘फ्रेंड्स’ सीरिज बघत होती तरुणी, व्हायरल होतोय फोटो
हेही वाचा : चिप्सच्या पुड्यांनी सजवली नवरदेवाची गाडी, नेटकरी म्हणाले, ” थेट दुकानच आणलं लग्नमंडपात” पाहा Viral Video
fitpro_fitness_2728 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुलीला कधी कमी समजू नका, दहा मुलाच्या बरोबरीची असते. तर एका युजरने लिहिलेय, “किती धाडसी मुलगी आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझी मुलगी सुद्धा अशीच राहील” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी कमेंट्मध्ये हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.