Viral Video : आधारकार्ड हे सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र आहे. प्रत्येकाचे आधारकार्ड असते.आधारकार्डवर आपला फोटो असणे आवश्यक आहे. त्यासाठी आधारकार्ड केंद्रावर जाऊन फोटो काढावा लागतो. तुम्ही जर लहानपणी आधारकार्ड काढले असेल तर त्यावरचा फोटो तुम्हाला कदाचित कधीही आवडला नसेल कारण त्यावेळी कसा फोटो काढावा, याविषयी काहीही समज नव्हती पण हल्ली सोशल मीडियाच्या या जगात रील आणि व्हिडीओमुळे लहान मुलांना फोटो काढताना पोझ कशी द्यावी हे लगेच कळते. (A Little Girl Gives Cute Poses for adhar card photoshoot video goes viral on social media)
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आधार कार्ड केंद्रावर आधारकार्डसाठी गोंडस पोझ देताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. हल्ली लहान मुले रील्स व्हिडीओ पाहून बऱ्याच गोष्टी शिकतात. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली चक्क फोटोशूटला पोझ देतात, तसे आधारकार्डसाठी फोटो काढताना पोझ देत आहे.
आधारकार्डसाठी फोटो काढताना चिमुकलीने केला चक्क फोटोशूट
हा व्हायरल व्हिडीओ एका आधारकार्ड केंद्रावरील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आधार कार्ड काढण्यासाठी या चिमुकलीला तिचे पालक घेऊन येतात. आधार कार्डच्या फोटोसाठी जेव्हा तिला कॅमेरासमोर उभे करतात तेव्हा ती गोंडस पोझ द्यायला सुरूवात करते. तिची आई तिला कॅमेऱ्यात बघायला सांगते. ती नवनवीन पोझ देताना दिसते. या चिमुकलीला पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणीची आठवण येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
gungun_and_mom या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्व रिल्समुळे होत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “मुली लहानपणापासूनच नाटकी असतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “जेवढ्या पोझेस मला पूर्ण आयुष्यात माहिती नव्हत्या तेवढ्या पोझेस या चिमुकलीला माहिती आहे” अनेक युजर्सना या चिमुकलीचा व्हिडीओ खूप आवडला आहे.