Funny video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ हसवतात तर काही व्हिडीओ रडवतात तर काही व्हिडीओ पाहून मन प्रसन्न होतं. आपण आपल्या जगाचा कसा अनुभव घेतो याचा भावना हा एक महत्त्वाचा भाग आहे. मानव आपल्या भावना इतरांना सांगून व्यक्त करू शकतो—पण प्राण्यांचे काय? माणसाला जसा आनंद होतो, दुःख होते तसंच प्राण्यांनाही होतो फक्त भावना व्यक्त करण्याची त्यांची पद्धत आपल्यापेक्षा थोडी निराळी असते. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये कधी कधी दोन प्राणी आपापसांत भांडताना, तर कधी मैत्रीसंबंध प्रस्थापित करताना, तर अनेक प्राणी आणि पक्षी त्यांच्या आगळ्यावेगळ्या सौंदर्याने मोहवून टाकतात. त्यांच्या हालचाली, हावभाव आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात.
आतापर्यंत तुम्ही गाय-म्हशींचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील मात्र कधी गायीला बोलताना पाहिलंय का? नाही ना मग.. हा व्हिडीओ पाहा. एक चिमुकली चक्क म्हशीबरोबर बोलत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, अनेक पाळीव प्राणी आपल्या मालकाची वाट पाहत थांबलेले असतात. प्राणी मुके असले तरीही ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करीत असतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली गावाकडे आहे आणि ती व्हिडीओमध्ये सांगते की, मी आता तुम्हाला दाखवते की माझी मामाची म्हैस कशी बोलते माझ्याशी. पुढे ती म्हशीकडे जाते आणि म्हशीला विचारते खायला पाहिजे? पाहिजे खायला? यावर म्हैस जे काही करते ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही. म्हैस चक्क मान हलवते आहे. ही मुलगी पुन्हा तिला विचारते अजून हवंय का? तेव्हाही ही म्हैस जोरात मान हलवत पाहिजे असं सांगते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> शिक्षिकेचा नादच खुळा! “अशी मी मदन मंजिरी..” गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले फॅन
“हे प्रेम फक्त गावाकडच्या मातीमध्येच दिसणार”
हा व्हिडीओ सोशल मीडियावर sapana0014 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांंगलाच पसंतीस उतरला आहे. व्हिडीओवर कमेंट्सचा भरभरून वर्षाव झाला आहे. “हे प्रेम फक्त गावाकडच्या मातीमध्येच दिसणार” असं व्हिडीओवर लिहलं आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ‘किती मस्त!