Viral video: सोशल माध्यमांवर दिवसभरात अनेक गोष्टी व्हायरल होतात. यामध्ये अनेक मजेशीर, विचित्र, धक्कादायक, भावुक करणारे व्हिडीओ पहायला मिळतात. सध्या असाच एक भावुक करणारा व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलं आहे.माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच आपल्या गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. यामध्ये एका चिमुकलीची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकलीची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत.
जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते, तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. शिकण्याच्या वयात जेव्हा खांद्यावर पुस्तकांच्या आधी जबाबदारीचं ओझं येतं ना तेव्हा नको ते कामही करावं लागतं. अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.
आपण आपल्या आजूबाजूला अशीही काही मुलं पाहतो; जी व्यसन, नशा, ड्रग्स यांच्या आहारी गेली आहेत. आई-वडिलांचा पैसा वाया घालवत ती मुलं चुकीची कामं करीत आहेत. मात्र, दुसरीकडे काही अशी मुलंही असतात की, ज्यांच्या खांद्यावर परिस्थितीमुळे कमी वयातच जबाबदारीचं ओझं येतं. या सगळ्यात ज्या मुलांना शिक्षण घ्यायचं असतं, त्यांनाही कधी कधी परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, तर कधी कधी काही पैशांसाठी नको ते काम त्यांना करावं लागतं. अशाच काही तरुणांचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली दुपारच्या वेळी भर उन्हात शेतात काम करताना दिसत आहे. खेळण्या-बागडण्याच्या वयात अशी जबाबदारी आली की उमलणाऱ्या कळया ,भर उन्हात कोमजताना दिसतात.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर official_vishwa_96k नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला “घरची जबाबदारी माणसाला खूप काही करायला भाग पाडते.” यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.