Little sister brother fight on Raksha bandhan : बहिण भाऊ हे नातं जगावेगळं आहे. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. एकमेकांवर रुसवा फुगवी दाखवत हे नाते आणखी दृढ होते. बहीण भावांनी एकमेकांबरोबर कितीही भांडण केले, तरी ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. रक्षाबंधन हा बहीण भावाच्या सुंदर नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते.
सोशल मीडियावर सध्या रक्षाबंधननिमित्त अनेक जुने नवे व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला पोट धरून हसायला येईल. या व्हिडीओमध्ये एक बहीण भावाला आधी राखी बांधते आणि दुसऱ्या क्षणी त्याचे केस ओढते. या बहीण भावांना पाहून तुम्हालाही तुमचे बहीण भाऊ आठवतील.
चिमुकले बहीण भाऊ रक्षाबंधनच्या दिवशीही भांडले
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला बहीण भाऊ दिसतील. व्हिडीओत बहीण भावाच्या हातावर राखी बांधताना दिसते. तितक्यात भाऊ असे काही बोलतो की बहीणीला राग येतो आणि बहीण सुद्धा काहीतरी पुटपुटते तेव्हा भाऊ तिचा हात बाजूला करतो. हे पाहून चिमुकल्या बहिणीला आणखी राग येतो आणि ती त्याचे केस ओढते. हे पाहून भाऊ सुद्धा तिला मारतो तेव्हा ती त्याच्या दूर जाते आणि व्हिडीओ संपतो.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांच्या बहीण भावाची आठवण येईल. काहींना त्यांचे बालपणीचे दिवस आठवतील. सध्या हा जुना व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : ‘तुम्ही मुली आहात का रे?’ फुटबॉल सामना हरल्यानंतर प्रशिक्षकाने खेळाडूंना लाथाबुक्यांनी तुडवलं; VIDEO व्हायरल
पाहा व्हायरल व्हिडीओ
itx_khushi_3003 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खरी रक्षाबंधन तर हीच आहे. बाकी सर्व मोह माया आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझा भाऊ सुद्धा असाच करतो” तर एका युजरने विचारलेय, “कोणाबरोबर असे घडले आहे का?” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ बहिणीचे प्रेम आहे. कितीही भांडण केले तरी बहीण भावांचा जीव असतो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला. काही युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काही युजर्सनी हार्टचे आणि हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. काही लोकांनी त्यांच्या बहीण भावांना टॅग केले तर काही युजर्स म्हणाले की रक्षाबंधनच्या दिवशी हा व्हिडीओ स्टेटसला लावणार.