भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ज्याला प्रेमाने एमएस धोनी, कॅप्टन कूल या नावाने ओळखले जाते. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी आजही त्याच्या फॅनफॉलोईंग आणि संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. क्रिकेटच्या मैदानात उल्लेखनीय कामगिरी करणारा धोनी आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. कॅप्टन कूल धोनीकडे कोट्यवधींची आलिशान घरे आणि महागड्या कार, बाईक्ससह आज एकूण किती संपत्ती आहे जाणून घेऊ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅप्टन कूलची संपत्ती तरी किती?

धोनीच्या सर्वात महागड्या मालमत्तांपैकी एक म्हणजे त्याच्या मूळ गावी, रांची येथे असलेले “कैलाशपती” नावाचे भव्य फार्महाऊस. अतिशय विस्तीर्ण अशा फार्महाऊसमध्ये अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे, ज्यात एक अल्ट्रा-मॉडर्न पर्सनल जिम, स्विमिंग पूल, क्रिकेटसाठी नेट प्रॅक्टिसिंग फील्ड, इनडोअर स्टेडियम, हिरवीगार बाग यासह एक ५ स्टार हॉटेलदेखील आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर अगदी शांत ठिकाणी हे फार्महाऊस आहे. या आलिशान फार्महाऊसची किंमत सहा कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या फार्महाऊसची रचना स्वत: धोनीने डिझाइन केली आहे.

रांचीच्या रिंगरोडमध्ये सात एकर जागेवर धोनीची ही मालमत्ता आहे. याशिवाय डेहराडूनमध्येही त्याचे एक आलिशान असे घर आहे, ज्याची किंमत सध्या अंदाजे १७.८ कोटी रुपये इतकी आहे.

रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीव्यतिरिक्त, धोनीकडे आकर्षक महागड्या कारपासून पॉवरफूल बाईक्सपर्यंत अनेक लक्झरियस गाड्या आहेत. “एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी” या त्याच्या बायोपिकमध्ये दाखवल्याप्रमाणे, धोनीला तरुण वयापासूनच बाईकची विशेष आवड आहे.

त्याचे गॅरेज म्हणजे कार, बाईक्स शौकिनांसाठी एक खरेखुरे नंदनवन आहे, धोनीकडे हमर H2 (रु. ७५ लाख), ऑडी Q7 (रु. ८८.३३ लाख), मित्सुबिशी पजेरो SFX, लँड रोव्हर फ्रीलँडर (रु. ४४.४१ लाख), महिंद्रा स्कॉर्पिओ, फरारी 599 GTO (रु. ३.५७ कोटी), जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक (रु. ७५.१५ लाख), निसान जोंगा (रु. १०.५ लाख), Pontiac Firebird Trans am, GMC Sierra (रु. ५३ लाख), मर्सिडीज बेंझ GLE, रोल्स रॉस सिल्व्हर शॅडो आणि सर्वात जुनी हिंदुस्थान मोटर्स एंबेसेडर अशा महागड्या कार आहेत.

किक्रेटनंतर जर कोणत्या गोष्टीवर धोनी प्रेम करत असेल तर ते बाईक्सवर म्हणावं लागेल. कारण त्याच्याकडे जवळपास ७० बाइक्सचा एक प्रभावी संग्रह आहे, ज्यात Harley-Davidson Fat Boy ही बाईक आहे, ज्याची किंमत २४.४९ लाख रुपये इतकी आहे. यानंतर Confederate Hellcat X132 ज्याची किंमत ४७ लाख इतकी आहे. इतकेच नाही तर ३५ लाखांची Ducati 1098 आणि Kawasaki Ninja H2 ज्याची किंमत ३२.९५ लाख इतकी आहे, अशा अनेक बाईक्स त्याच्याकडे आहेत. यामाहा राजदूत ही धोनीची पहिली बाईक आजही त्याच्या गॅरेजमध्ये आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या कार्स आणि बाइकसाठी एक भव्य असं गॅरेज उभं केलं आहे.

धोनीचे एकूण नेट वर्थ

आपल्या बहुआयामी कारकिर्दीस आपल्या व्यावसायिक उपक्रमांतून धोनीने भरपूर संपत्ती कमावली आहे, ज्यामुळे क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये त्याने स्थान मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळलेल्या धोनीची एकूण संपत्ती १०,१४० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्याच्या निव्वळ संपत्तीमध्ये त्याच्या वार्षिक पगाराचा समावेश होतो, जो ५० कोटी रुपयांहून अधिक आहे; तर त्याला अनेक ब्रँड ॲडॉर्समेंटमधून २७ डॉलर इतकी संपत्ती मिळते. त्यामुळे धोनी आज जागतिक स्तरावर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेला धोनी जाहिरातींसाठी आणि ब्रँड सहयोगासाठी जबरदस्त फी आकारतो. Reebok, Pepsi आणि GoDaddy यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सच्या जाहिरातींमुळे त्याची आर्थिक स्थिती आणखी मजबूत झाली आहे, ज्यामुळे तो जागतिक स्तरावर सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक बनला आहे.

यात भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) धोनीचा यथोचित गौरव केला आहे. त्याच्या संपूर्ण करियरमध्ये त्याला मॅचसाठी भरघोस फी, बोनस आणि आकर्षक सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत अभिनीत एमएस धोनी: द अनटोटल्ड स्टोरी या त्याच्या बायोपिकमधूनही त्याने ३० कोटी रुपयांची कमाई केली. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असताना त्याचा वार्षिक पगार ५० कोटींहून अधिक होता, तर त्याला अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधून मिळणारे उत्पन्न २७ मिलियन डॉलर असल्याचे सांगितले जाते, यात आयपीएलसाठी तो १२ कोटी रुपये इतकी फी घेतो.

धोनीची इतर क्षेत्रातील गुंतवणूक

महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या पलीकडे अनेक क्षेत्रांमधून अमाप संपत्ती कमवली आहे, ज्यामुळे एक खेळाडू असण्याबरोबरच तो एक चांगला उद्योजकदेखील आहे. प्रसिद्ध फुटवेअर ब्रँड सेव्हनचा तो ब्रँड अॅम्बेसेडर असण्याबरोबर तो प्रमुख भागधारक आहे. इतकेच नाही तर धोनीचा फॅशन आणि फिटनेसच्या क्षेत्रातही प्रभाव दिसून येतो. स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (Sportsfit World Pvt) या कंपनीची मालकी धोनीकडे आहे. ही कंपनी स्पोर्ट्सफिट वर्ल्ड नावाने भारतभर २०० हून अधिक जिम चालवते.

शिवाय, धोनीचे व्यावसायिक कौशल्य त्याच्या विविध गुंतवणुकीतून दिसून येते. Rhiti Group, KhataBook, आणि 7InkBrews यांसारख्या प्रख्यात संस्थांमध्ये त्याची भागीदारी आहे, अनेक क्षेत्रांमध्ये त्याची आर्थिक गुंतवणूक आहे. विशेष म्हणजे, रांचीमधील हॉटेल माही रेसिडेन्सीचीही मालकी त्यांच्याकडे आहे. चेन्नईयिन एफसी फुटबॉल संघ, रांची रेज हॉकी संघ आणि माही रेसिंग टीम इंडिया यांसह विविध क्रीडा फ्रँचायझींमध्येही त्याचा मालकी हक्क आहे.

धोनीची पत्नी, साक्षी सिंग धोनी ही धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड (DEPL) ची मालक आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेल्या या प्रोडक्शन हाऊसने अलीकडेच त्यांच्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली, ज्याचे नाव आहे, “लेट्स गेट मॅरिड.” ज्याचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश थमिलमणी यांनी केल्याचे सांगितले जाते.