Breakup Revenge : प्रेम प्रकरण आणि ब्रेकअपची अनेक प्रकरणे तुम्ही ऐकली असतील. अनेक वर्षे बरोबर राहून नात्यातील तणावाला कंटाळून ब्रेकअप करतात. अशाच एका ब्रेकअप झालेल्या २४ वर्षीय तरुणीला तिचा एक्स बॉयफ्रेंड गेल्या चार महिन्यापासून त्रास देत होता. तो कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर तिला पार्सल पाठवत होता. तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक करण्यात आली आहे.

या तरुणीला एका स्टॉकरकडून अनेकदा कॅश ऑन डिलिव्हरी पॅकेजेस आले होते. त्यामुळे तिला नाहक त्रास सहन करावा लागला. एवढंच काय तर तिचे अकाउंट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टकडून ब्लॉक करण्यात आले.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सुरुवातीला तिच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकाऱ्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय होता पण नंतर तिला कळले हे सर्व तिचा एक्स बॉयफ्रेंड सुमन सिकदर करत होता.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नादिया येथील रहिवासी सिकदर हा तरुणीला अनेक वर्षापासून ओळखत होता. त्याचे नुकतेच या तरुणीबरोबर ब्रेकअप झाले, ज्यामुळे त्याने सूड उगवण्यासाठी तिला अनेक पार्सल पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. ” तिच्या बॉयफ्रेंडनी पार्सल बुकिंग केल्याची आणि अज्ञात नंबरवरून मेसेज आणि कॉल करून तिला त्रास दिल्याची कबुली दिली आहे. त्याने असे करण्यामागील कारण सुद्धा सांगितले. या तरुणीला ऑनलाइन शॉपिंग खूप आवडते आणि ती अनेकदा त्याला भेटवस्तू मागायची, जे त्याला परवडणारे नव्हते. त्याला असे वाटले की तो तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत नसल्याने त्याला सोडून गेली. म्हणूनच तो तिला कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर पार्सल करून त्रास देऊ लागला,” असे पोलिसांनी सांगितले.

तरुणीने सांगितले की गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिचे तरुणाबरोबर ब्रेकअप झाले होते. तिच्या ब्रेकअपनंतर तिला तिच्या घरी पाठवलेले अनेक पार्सल परत करावे लागले.
तरुणी सांगते, “ते सर्व कॅश ऑन डिलिव्हरी प्रोडक्ट होती. त्यात टॅब्लेट, मोबाईल फोनपासून कपडे, भेटवस्तू इत्यादींचा समावेश होता. फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन वीकमध्ये भेटवस्तू आणि प्रोडक्टच्या अनेक डिलिव्हरी आल्यात. डिलिव्हरी एजंटशी माझे वारंवार भांडण झाले. जेव्हा मी ई कॉमर्सशी बोलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी माझे अकाउंट ब्लॉक केले आहेत.”
सिकदरला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला जामीन मंजूर करण्यात आला