वाहन चालवताना ओव्हरटेकिंग करणे धोकायदक असते हे माहित असूनही अनेकदा लोक सर्रासपणे तेच करताना दिसतात. ओव्हरटेकिंग म्हणजे ड्रायव्हिंग करताना आपली लेन सोडून किंवा पासिंग लेन वापरून समोर धावणाऱ्या दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाणे आणि एकदा पुढे गेले की पुन्हा आपल्या लेनमध्ये परत येणे. महामार्ग, रस्ते किंवा रेसिंग ट्रॅकवरही ओव्हरटेकिंग केले जाऊ शकते, परंतु ते सुरक्षितपणे करणे आणि अपघात टाळण्यासाठी रहदारी नियम आणि नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. अनेकदा समोरील गाडीच्या पुढे जाण्याच्या नादातच अपघात होतो विशेषत: जर धोकादायक परिस्थितीत ओव्हरटेकींग केले तर. म्हणूनच ओव्हरटेकींग करून नये असे वारंवार बजावले जाते.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर ओव्हरटेकिंग करणाऱ्या तीन बसचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असताना बाजूने तिसरी बस देखील ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ओव्हरटेकिंगच्या नादात मोठा अपघात झाला असता पण सुदैवाने मोठा अनर्थ टळतो. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Accident video viral where Speedy Bus hit the man shocking video on social media
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; बसने दिली धडक, टायरखाली येणार इतक्यात…, पुढच्याच क्षणी काय झालं पाहा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Car, ST buses hit, flyover , Nagpur,
नागपुरात उड्डाणपुलाखाली कार, एसटी बसेस परस्परांवर धडकल्या, ९ प्रवासी जखमी
Robbery Viral Video
“१० रुपयांच्या नादात गमावले हजारो रुपये” कारचालकांनो व्हा सावध! तुमच्याबरोबरही घडू शकते अशी घटना; पाहा धक्कादायक VIDEO
Viral Video
Viral Video : देव तारी त्याला कोण मारी… रस्ता ओलांडताना दोन बसमध्ये अडकला; Video पाहून नेटकरी थक्क
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…
A youth died in a bus accident near Gorai Agar Mumbai news
गोराई आगारातील बसने तरुणाला चिरडले,भाडेतत्वावरील बस अपघातांच्या घटनांचे सत्र सुरुच
Indian Railways shocking video viral
VIDEO : चूक कोणाची? रेल्वेची की बेशिस्त प्रवाशांची? धावत्या ट्रेनमध्ये वृद्ध प्रवाशाचे धक्कादायक कृत्य

व्हायरल व्हिडीओ एक बसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असावा. व्हिडीओमध्ये दिसते की, एक बस भरधाव वेगाने धावत आहे. दरम्यान समोरून दुसऱ्या रस्त्याने एक बस समोर येते. दरम्यान भरधाव वेगाने येणारी बस समोर असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. संधी मिळताच बस ड्रायव्हर समोरून धावणाऱ्या बसच्या बाजूने पुढे जाण्यासाठी एका लेनमधून दुसऱ्या लेनमध्ये जातो पण तेवढ्यात त्याला समोरून एक कार येताना दिसते आणि अचानक मागे धावणारी तिसरी बस ओव्हरटेक करण्याच्या नादात तिसऱ्या लेनमधून पुढे आल्याचे दिसते. ओव्हरटेकिंगच्या नादात तिन्ही बसचा मोठा अपघात झाला असता पण सुदैवाने तिन्ही बस चालक आणि समोरून येणारी कार वेळीच ब्रेक मारतात आणि मोठा अनर्थ टळतो. व्हायरल व्हिडीओ पाहताना नेटकऱ्यांचा अक्षरश: श्वास रोखला जात आहे.

हेही वाचा – बापरे! क्षणार्धात अख्खा डोंगर कोसळला, सैरावैरा धावत सुटले लोक, काळजात धडकी भरवणारा Video Viral

हेही वाचा – “भूक किती वाईट असते ना!” पंचपक्वान्नाने भरलेल्या ताटाच्या पोस्टरला हात लावून चिमुकल्याने भरलं पोट, हृदयद्रावक Video Viral

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर plusdrive_15 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोणत्या बस ड्रायव्हरची चूक होती? सावध राहा!”

हेही वाचा – कंडक्टरचा दयाळूपणा! रस्त्यावर पेन विकणाऱ्या वृद्ध व्यक्तीची मदत, Viral Video एकदा बघाच

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंटस् देखील केल्या आहेत. एकाने लिहिले, “कार डायव्हरला काही सेंकदासाठी समोरून यमराज येताना दिसला असेल.”

दुसरा म्हणाला, “या देशात वाहतूकीच्या नियमांचे कडक शिस्तीने पालन केले पाहिजे.”

तिसरा म्हणाला, “त्याला डबल ओव्हर टेक म्हणतात..जोपर्यंत कोणीही विरुद्ध दिशेने येत नसले तरीही खूप धोका असतो.”

Story img Loader