सोशल मीडियावर लहान मुलामुलींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी लहान मुलांचा खोडकरपणा तर कधी त्यांची मस्ती युजर्स आवडीने बघतात. महिलांना मेकअपचं वेड असतं, असं म्हणतात. एका चिमुकलीलाही असंच मेकअपचं भयंकर वेड आहे. मेकअपच्या नादात तिने चक्क कोंबडीला नेल पॉलिश लावले आहे. नेल पॉलिश लावतानाचा तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ही चिमुकली जमीनीवर बसली आहे आणि कोबंडीच्या नखांना नेल पॉलिश लावत आहे. चिमुकली खूप प्रेमाने नेल पॉलिश लावत आहे. विशेष म्हणजे कोंबडीही चिमुकलीला शांतपणे नेल पॉलिश लावू देत आहे.
सोशल मीडियावर चिमुकली आणि कोंबडीच्या या मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे.
हेही वाचा :Viral Video : मित्र असावा तर असा! मालकाला मदत करण्याची श्वानाची धडपड; हृदयस्पर्शी व्हिडीओ
pakka_mancherial_ammai या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सना हा व्हिडीओ पाहून त्यांच्या बालपणीची आठवण आली आहे.
एका युजरने लिहिले आहे, “एक मुलगीच इतर मुलींच्या कलेला समजू शकते.” तर एका युजरने लिहिले, “मेकअप हा मुलीचा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे” आणखी एका युजरने लिहिले आहे, “कोंबडीला नेल पॉलिश आवडले वाटते”