Viral video: काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. असाच एका तरुणाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तरुण बुलेटवर जावघेणी स्टंटबाजी करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक काय करतील याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हात सोडून आपली बुलेट पळवताना दिसत आहे. इतकेच नव्हेतर तो चालू गाडीवर बंदूक चालवत थरारक स्टंट करताना ही दिसत आहे. हा व्हिडीओ रस्त्यावरून जाणाऱ्यांपैकीच कुणीतरी रेकॉर्ड करून, तो आता व्हायरल झाला आहे. अनेक महाभाग प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीवदेखील धोक्यात टाकतात. त्यापैकी काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात; तर काहींना जन्माची अद्दल घडते.व्हायरल व्हिडीओ हा सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहीद पथ येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Tata Technologies IPO: “हे दुःख वर्ल्डकप हरल्यापेक्षा मोठं” आयपीओ लिस्टिंगनंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही हेच खरं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ एक्सवर Gaurav singh Chauhan या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडीओ पाहून नेटकरी असे स्टंट टाळण्याचे आवाहन करत आहेत.