Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कुत्र्याचे व्हिडीओ तर कधी मांजरीचे व्हिडीओ समोर येतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात. सध्या असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुत्र्यांना फिरवणारी एक व्यक्ती लिफ्टमध्ये कुत्र्याला मारताना दिसत आहे. मुक्या प्राण्याला असे अमानुषपणे मारहाण करताना पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सीसीटिव्ही फुटेज सगळीकडे व्हायरल होत आहे.
कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा प्राणी आहे. कुत्र्याचे माणसाबरोबरच्या मैत्रीचे अनेक उदाहरणे तुम्ही पाहिली असेल पण हल्ली कुत्र्यांबरोबर अनेक वाईट प्रकार घडताना दिसत आहे. सोशल मीडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. आता ही अशीच एक घटना समोर आली. गुरुग्राम येथील या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका लिफ्टमध्ये कु्त्रा दिसेल आणि त्याच्याबरोबर एक व्यक्ती दिसेल. कुत्रा फिरवणारा व्यक्ती कचरा उचलणाऱ्या वस्तुनी कुत्र्याला मारताना दिसत आहे. कुत्र्याच्या चेहऱ्यावर ही व्यक्ती अमानुषपणे मारताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.
हेही वाचा : VIDEO : डिझेल पराठा कधी खाल्ला का? सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली जोरदार टिका, शेवटी मालकाने सांगितले…
पाहा व्हिडीओ
Vidit Sharma या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आता यावर बोलण्याची आणि कारवाई करण्याची वेळ आली आहे. चला तर माणसांना आणि प्राण्यांना सुरक्षित करू या.” कॅप्शनमध्ये #StopAnimalCruelty #dogs असा हॅशटॅगही लिहिला आहे.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून खरंच वाईट वाटले. जे लोक कुत्र्याला घरच्या सदस्याप्रमाणे प्रेम करतात आणि कुत्र्याला फिरवण्यासाठी अशा व्यक्तीला नेमतात ज्याला कुत्र्याविषयी काहीही संवेदना नसते त्यांच्यासाठी ही घटना एक वाईट धडा आहे. कृपया आपल्या पाळीव प्राण्यांसाठी वेळ काढा” तर एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “हे खरंच वाईट आहे. त्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे पण पाळीव प्राण्यांच्या मालकांनी पाळीव प्राण्यांसाठी वेळ काढायला पाहिजे. दुसऱ्यांच्या विश्वासावर सोडू नये.” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे लोकांना शिक्षा झाली पाहिजे.”