Delhi Metro Viral Video : दिल्लीची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी दिल्ली मेट्रो अनेकदा चर्चेत असते. दिल्ली मेट्रो कधी आपल्या परवडणाऱ्या प्रवासासाठी तर कधी सोशल मीडियावर व्हायरल होणार्या व्हिडिओंमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असते. पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोतील एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा नाचताना दिसत आहे.
मित्रांच्या विनंतीवरून मुलाने डान्स केला
दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये, एक मुलगा ‘चोली के पिछे’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. DMRC दिलेल्या चेतावणीचे उल्लंघन करताना दिसत आहे. तर इतर लोक त्या मुलाचा डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे नाचायला सांगत आहे.
दिल्ली मेट्रोतील असा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये लोक सीटसाठी एकमेकांशी भांडताना दिसत होते. यासोबतच अनेक जोडपी चालत्या ट्रेनमध्ये अश्लील कृत्य करताना दिसत होते.मेट्रोमध्ये डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
हे ही वाचा – मुंबईच्या रिक्षावाल्यांची बंगळुरुच्या रिक्षाचालकांबरोबर केली तुलना; म्हणे, ”UPI पेमेंटसुध्दा घेत नाही”
डीएमआरसीने रील बनवणाऱ्यांवर केली होती दंडाची तरतूद
डीएमआरसीने मेट्रोमध्ये किसिंग, पोल डान्स, ब्रेक डान्स आणि बिकिनी परिधान करुन प्रवास, सारख्या घटनांना तोंड देण्यासाठी आणि रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दंडाची तरतूद केली होती. यासोबतच असे करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला होता, मात्र त्यानंतरही मेट्रोमध्ये आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही असे दिसत आहे.
हे ही वाचा – बर्फाच्या लाद्या कशा तयार केल्या जातात? पाहा फॅक्टरीमधील व्हिडीओ
मेट्रोने ट्रव्हल करा ट्रबल नाही : DMRC
अलीकडेच, DMRC ने सोशल मीडियावर मेट्रो ट्रेनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर नाचण्याविरुद्ध चेतावणी देणारी एक मजेदार सल्ला जाहीर केला होता.. मेट्रोने लोकांना आपला मुद्दा मांडण्यासाठी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील प्रसिद्ध मीमसह ट्रेनमध्ये नाचू नये असा सल्ला दिला. डीएमआरसीने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या मीममध्ये, अॅव्हेंजर्स चित्रपटातील एक दृश्य दाखवले आहे आणि म्हटले आहे, ‘मेट्रोने ट्रव्हल करा, ट्रबल नाही.’.