Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी गाणी म्हणताना दिसतो. अनेक जण सोशल मीडियावर लोकप्रिय करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल हो आहे या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या ई – रिक्षाच्या छतावर उभा राहून डान्स करताना दिसत आहे. पुढे या तरुणाबरोबर असे काही घडते की पाहून तु्म्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल एक तरुण रिक्षाच्या छतावर उभ्याने डान्स करत आहे. तो नजर का तीर हटा या लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतो. विशेष म्हणजे तो चालत्या ई – रिक्षावर डान्स करत आहे. रील बनवून लोकप्रिय होण्यासाठी वाट्टेल ते करतात. या तरुणाने सुद्धा असेच काही केले पण पुढे त्याला ते चांगलेच महागात पडले.व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करणाऱ्या तरुणाचा पुढे तोल जातो आणि तो खाली पडतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिक्षा कोण चालवत आहे? व्हिडीओत एक व्यक्ती ई – रिक्षा चालवताना दिसतोय. त्याचा चेहरा व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : निरोगी राहण्यासाठी तुमच्या मुलांना ठेवा ‘या’ सवयींपासून दूर; डॉक्टरांनी दिला सल्ला, पाहा VIDEO
babusingh7160 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,”नजर का तीर हटा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नजर का तीर हटी दुर्घटना घटी” तर एका युजरने लिहिलेय, “ई रिक्षा चालकाचा आदर करतो” आणखी एका युजरने मिश्किलपणे लिहिलेय, “बेहती हवा सा था वो, कहा गया उसे ढुंढो..” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.