Viral Video : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. वाढत्या उन्हामुळे सर्वजण आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. उन्हामुळे एसी, कुलर, फॅनशिवाय दोन मिनिटे सुद्धा आपण राहू शकत नाही. त्यात पिण्यासाठी फ्रिज किंवा माठातील थंड पाणी आपण आवर्जून वापरतो पण अंघोळीसाठी अनेकदा आपल्याला हवे तितके थंड पाणी वापरता येत नाही. कडक उन्हामुळे नळाला किंवा शॉवरला सुद्धा गरम पाणी येते. एका माणसाने थंड पाण्याने अंघोळ करता यावी म्हणून अनोखा जुगाड शोधला आहे. हा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल. वाढता उन्हाळा लक्षात घेऊन अनेक जण उन्हापासून वाचण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करताना दिसतात.या माणसाने केलेला जुगाड पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करण्यासाठी एका माणसाने अनोखा जुगाड शोधला आहे. असा जुगाड तुम्ही कधी यापूर्वी पाहिला नसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका शॉवरच्या खाली चाळणी लावली आहे आणि या चाळणीला बांधले आहे. या चाळणीत तुम्हाला बर्फाचे तुकडे दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चाळणीत असलेल्या बर्फामुळे शॉवरचे पाणी थंड होते आणि थंड पाण्याचा तुम्ही अंघोळीसाठी वापर करू शकता. हा जुगाड पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : धक्कादायक! डोक्यावर नारळ फोडले अन् पुढच्या क्षणी खाली पडला, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
high.br0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हे टॅलेंट भारताच्या बाहेर जाऊ नये” तर एका युजरने लिहिलेय, “इंडियन टॅलेंटच्या पुढे कोणी काहीही बोलू शकत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करायची निंजा टेक्निक. अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहेत.