viral Video : सध्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांविषयी लोक भावना व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांसाठी तब्बल पाच वर्षांपासून चप्पल घालत नाही. या व्यक्तीबरोबर एका तरुणाने संवाद साधला. या संवादाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाच वर्षांपासून चप्पल घालत नसलेली व्यक्ती दिसेल आणि एक तरुण त्या व्यक्तीला प्रश्न विचारताना दिसतो.
तरुण – तुम्ही पाच वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांसाठी चप्पल घातली नाही, त्याविषयी काय सांगाल?
व्यक्ती – छत्रपती संभाजी महाराजांना ज्या वेळी पकडलं. बहादूर गडावर ज्या वेदना दिल्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तुळापूरला बलिदान दिले. शंभुराजांना ४० दिवस ज्या वेदना झाल्या त्यासाठी आपल्या महाराष्ट्रात बलिदान मास चाळीस दिवस पाळला जातो. कोणी संभाजी महाराजांसाठी टक्कल करतं, कोणी चप्पल सोडतं, कोणी आनंद साजरा करत नाही. ज्या दिवशी मला बलिदान मासविषयी कळले तेव्हा मी काय निश्चय केला. सोडायचं तर कायमचं सोडायचं म्हणून मी कायमची चप्पल सोडली.
या व्यक्तीचे उत्तर ऐकून तुम्हीही भारावून जाल. काही लोक हा व्हिडीओ पाहून भावुक होतील. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Vieo)
या व्यक्तीचे नाव कुंडलिक जाधव असून त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मल्हारगडच्या पायथाला मला एक मावळयांने प्रश्न विचाराला होता
५ वर्ष झाली पायात चप्पल का घालत नाही?
त्यावेळी त्यांना मी माझ्या परीने उत्तर दिले. या व्हिडीओला आज वर्ष होईल. आज सकाळी वडापाव घेण्यासाठी आलेल्या १२ वर्षाच्या लहान मुलीने इन्स्टाग्राम वरील तो व्हिडीओ दाखवून विचारले, “या व्हिडिओमध्ये तुम्हीच आहात ना?”
मी म्हणालो, “हो बेटा.” आज केलेल्या कामाचं चीज झाल्यासारखं वाटलं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच अभिमान आहे दादा तुमचा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे” तर एका युजरने लिहिलेय, “मराठ्यांच्या ज्वलंत हतिहासातलं एक हळवं पान !” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरा महाराजांचा मावळा आहेस भावा..” एक युजर लिहितो, “तुमच्या निष्ठेला सलाम, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे” तर एक युजर लिहितो, “या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास २८ फेब्रुवारी ते २९ मार्च पर्यंत आहे ज्याला जमले तर या दिवसात आपल्या कोणत्याही आवडत्या गोष्टीचा त्याग करा, आणि राजाचं बलिदान स्मरण करा”